बोधी आर्थिक साक्षरतेची
-
१ एप्रिलपासून बदलणारे कर आणि गुंतवणूक नियम
– ३१ मार्च २०२६ रोजी आर्थिक वर्ष समाप्त होत असून आता केवळ दोन दिवस उरले आहेत. या पार्श्वभूमीवर करदाते आणि गुंतवणूकदारांनी काही महत्त्वाच्या आर्थिक बाबी तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा दंड, करसवलतींचा तोटा किंवा काही खाती निष्क्रिय होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या दिवसापासून होणाऱ्या बदलांचा थेट परिणाम बँक खाते, गुंतवणूक आणि करसवलतींवर होणार… Continue reading
-
कर्ज प्रकरण आणि वर्तन !
– सुरक्षित कर्जव्यवहारात आपण सर्वप्रथम काय पाहतो? कर्ज करार, तारणपत्र, हमी, व्याजदर आणि परतफेड वेळापत्रक ? हे सर्व काही व्यवस्थित असेल तर कायदेशीरदृष्ट्या आपण सुरक्षित असल्याचे आपल्याला वाटत असते. म्हणजे हा कर्ज व्यवहार सुरक्षितच आहे — असा आपला समज असतो. पण प्रत्यक्ष अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. बहुतांश वेळा कर्जदार आणि कर्ज देणारा यांच्यामध्ये वाद निर्माण… Continue reading
-
SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. रघुवीर अधिकारी (C.E.O.) यांच्या लेखणीतून…
– मी गेली एकतीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या कालावधीत मी अनेक आर्थिक चक्रे पाहिली जसे की तेजी, मंदी, घसरण, उत्साह, भीती, धोरणात्मक बदल आणि कोरोनासारखे अनपेक्षित धक्के. पण या सर्वांमध्ये एक गोष्ट कायम राहिली — मानवी भावना, त्यापायी घेतले जाणारे निर्णय आणि त्यांचा आर्थिक नियोजनावर होणारा परिणाम. या दीर्घ प्रवासात मला… Continue reading
-
SWS: ३१ वा वर्धापनदिन विशेष : श्री. दिपक कुलकर्णी (M.D.) यांच्या लेखणीतून…
– प्रिय गुंतवणूकदार, हितचिंतक आणि संपूर्ण SWS टीम.. संस्थेच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त हा लेख लिहितांना मला निरतिशय आनंद होतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे तंत्रज्ञानाच्या अफाट प्रगतीच्या वेगात आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगातही, आमच्या व्यावसायिक प्रवासात आपण सर्वांनी संस्थेवर दाखवलेला अतूट विश्वास !! आज AI च्या साह्याने अगदी काही सेकंदांतच, इतर माहितीप्रमाणेच विमा आणि गुंतवणूकीच्या… Continue reading
-
नाशिकमधील गुंतवणूकदारांसाठी एक विश्वासार्ह संधी
– नाशिक शहराचा वेगाने होत असलेला शहरी विकास, वाढती लोकसंख्या आणि आगामी मोठ्या धार्मिक व पायाभूत प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर दीर्घकालीन वित्तीय नियोजनाची आवश्यकता निर्माण झाली आहे. या गरजेची पूर्तता करण्यासाठी नाशिक महानगरपालिका (NMC) वेळोवेळी म्युनिसिपल बाँड्सच्या माध्यमातून निधी उभारणी करत आहे. हे बाँड्स गुंतवणूकदारांना स्थिर उत्पन्नासोबतच शहराच्या विकासात थेट सहभागाची संधी उपलब्ध करून देतात. २००० पूर्वीचे… Continue reading
-
ई-रुपी रोख रकमेची जागा घेईल काय ?
– ई-रुपी किंवा डिजिटल रुपया ही भारताची सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (सीबीडीसी) आहे,जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे जारी केलेले अधिकृत डिजिटल चलन आहे. हे भारताचे डिजिटल चलन ई-रुपी, कागदी चलनाचे, इलेक्ट्रॉनिक रूप आहे. डिजिटल रुपया १ डिसेंबर २०२२ रोजी सुरू करण्यात आला. हे रुपयात रूपांतरित केले जाऊ शकते. ई-रुपीमुळे लोकांना खिशात रोकड ठेवण्याची गरज राहत… Continue reading
-
आर्थिक निर्णय घेतांना भावना जरा बाजूला ठेवा !!
= मी गेली तीस वर्षे वित्तीय सेवा क्षेत्रात काम करत आहे. या दीर्घ प्रवासात मला एक गोष्ट वारंवार अनुभवायला मिळाली आहे — आर्थिक निर्णय हे नेहमी तर्कशुद्ध असतातच असे नाही. अनेकदा हे निर्णय मनातील विविध भावना जसे राग, नाराजी, अहंकार, भिती किंवा अपूर्ण माहिती यांच्या प्रभावाखाली घेतले जातात. Behavioral Finance ही शाखा नेमकी याच मानवी… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १३: पुस्तकी कायदा आणि प्रत्यक्ष
– बँकेत लागल्यानंतर Certified Associate of the Indian Institute of Bankers (C.A. I. I.B. ) ही परीक्षा असते. अर्थात परीक्षा देणं / न देणं ऐच्छिक असतं. परीक्षा पास झाल्यास पगारवाढ म्हणजेच इन्क्रिमेंट मात्र मिळतं. अर्थात बँकेचा मूळ हेतू असतो तो कर्मचाऱ्यांना बँकिंगचा गाभा कळावा, योग्य/अयोग्याची जाणीव व्हावी, नियम आणि अटींची ओळख व्हावी, थोडक्यात म्हणजे जे… Continue reading
-
भारत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था – पण फायदा सर्वांपर्यंत पोहोचतो आहे का?
– अलीकडे भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान मिळवला आहे. GDP (Gross Domestic Product) या निकषावर भारताचा आर्थिक आकार सुमारे 4.2 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्स इतका झाला आहे. ही बाब निश्चितच अभिमानास्पद आहे. मात्र, याच वेळी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो — ही आर्थिक वाढ सर्वसामान्य नागरिकांच्या आयुष्यात कितपत बदल… Continue reading
-
तर्कशुद्ध आर्थिक निर्णय आणि संपत्ती निर्माण
(Rational Financial Decision & Wealth Creation) जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना — युद्धसदृश परिस्थिती, व्याजदरांमधील बदल, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे किंवा एखादे अनपेक्षित संकट — या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होतो. अशा वेळी बाजारात चढउतार वाढतात, पोर्टफोलिओचे मूल्य तात्पुरते कमी होते आणि गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता अनेकदा घाईघाईच्या आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांकडे नेते.… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२: दोन टोकाच्या मनुष्यस्वभावाचे दर्शन – नोटबंदी.
– आम्हा बॅंकर्सचा डोलारा उभा असतो आमचा सेक्युरिटी गार्डच्या जीवावर. तर नोटबंदीचे दिवस. एरव्ही सुद्धा सदैव दक्ष, कोणत्याही कामाला कधीही नाही न म्हणणारा आमचा सिक्युरिटी गार्ड, आमच्या कुटुंबातीलच सदस्य सुभाष सिंग गेले तीन दिवस जो भिंगरीसारखा गरगरतोय, कॅशशी संबंधित प्रत्येक हालचालीवर घारीसारखी नजर ठेवत, स्टाफसाठी खाणं चहा अतिशय आत्मीयतेने करतोय. पाचसातशे किंवा कमीअधिक क्राऊड मॅनेज… Continue reading
-
QR कोडचे जनक : जपानी अभियंता मसाहिरो हारा
– – QR कोड आज जगभरातील दैनंदिन व्यवहारांचा अविभाज्य भाग बनला आहे. डिजिटल पेमेंट्स, रेस्टॉरंटमधील मेन्यू, बस किंवा चित्रपटांची तिकिटे, औषधांच्या डब्यांवरील माहिती, सरकारी योजना – असंख्य ठिकाणी QR कोडचा वापर होत आहे. एका छोट्या चौकोनी कोडने संपूर्ण डिजिटल अर्थव्यवस्थेचा चेहराच बदलून टाकला आहे. ११ डिसेंबर २०२५ रोजी राज्यसभेतील एका अधिवेशनात नामनिर्देशित सदस्य सुधा मूर्ती… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग १२:अग्निपरीक्षा – नोटबंदी.
– नोटबंदीचे दिवस हे प्रत्येक बँकरसाठी अस्वस्थ करणारा अनुभव होता. याच दिवसांचे चित्रण पुढील लेखांमधे केले आहे. सिरीज नोटबंदी. नोव्हेंबर २०१६ : संध्याकाळी नवऱ्याचा फोन आला, “पाचशे हजाराच्या नोटा मध्यरात्रीपासून रद्द होणार. ” मी म्हंटलं, “चल काहीतरीच थट्टा करू नको.” पण टीव्ही चालू केला आणि प्रत्येक चॅनलवर एकच बातमी घणघणत होती. आज रात्रीपासून नोटा… Continue reading
-
फिनफ्लुएंसर कितपत विश्वसनीय?
– इंटरनेटच्या मायाजालात अनेक फिनफ्लुएंसर प्रसिद्ध आहेत आणि आजकाल बरेच जण सोशल मीडियावर उपस्थित अशा इन्फ्लुएन्सरच्या सल्ल्याने गुंतवणूक करतांना दिसतात. अशा तमाम जनतेने सावध होण्याची वेळ आलेली आहे. नुकतेच SEBI ने एका अशाच प्रसिद्ध फिनफ्लुएंसर आणि त्यांची कंपनी यांना शेअर बाजाराशी संबंधित कोणताही आर्थिक व्यवहार करण्यास बंदी घातली आहे. तसेच त्यांची ₹ ५४६ कोटींची रक्कम… Continue reading
-
आरोग्य विमा : फसवणूकीचे वाढते प्रमाण
– भारतीय आरोग्य विमा क्षेत्राशी निगडीत BCG (Boston Consulting Group) आणि Medi Assist यांच्या संयुक्त अहवालातून धक्कादायक सत्य आणि निष्कर्ष बाहेर आले आहेत. भारतातील आरोग्य विमा क्षेत्रात फसवणुकीमुळे दरवर्षी तब्बल ८,००० ते १०,००० कोटी रुपयांचा फटका विमा कंपन्यांना बसत असल्याचे या अहवालांमधून उघड झाले आहे. यामध्ये विशेषतः रीइम्बर्समेंट (परतफेड) क्लेम्स, मध्यम रकमेची बिले आणि ओळख… Continue reading
-
हाऊसिंग सोसायटी आणि अकार्यक्षम निधी व्यवस्थापन
– भारतातील गृहनिर्माण सोसायट्या आणि सहकारी गृहनिर्माण संस्था (Cooperative Housing Societies) यांच्या खात्यांमध्ये बरीच मोठी रक्कम, बचत खात्यांमध्ये आणि फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FDs) अडकून पडली आहे. सदस्यांकडून दर महिन्याला आकारले जाणारे मेंटेनन्स शुल्क, वेळोवेळी घेतलेली आणि शिल्लक उरणारी वर्गणी एकत्रितपणे हळूहळू मोठ्या निधीत रूपांतरित होते. मात्र या निधीचे व्यवस्थापन, अति संरक्षणवादी (Conservative) पद्धतीने केले जाते —… Continue reading
-
डिजिटल सोनं – चमक खरी की भुलभुलैया?
– 💬 SEBI चा इशारा: “डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याआधी नीट समजून घ्या!” आजकाल मोबाईलवर काही क्लिकमध्ये सोनं विकत घेण्याच्या जाहिराती सर्वत्र दिसतात — “₹१० मध्ये सोनं घ्या” / “मोबाईलमध्ये सोनं साठवा” / “डिजिटल गोल्ड तुमचे भविष्य साकारेल”. अशा आकर्षक घोषणांमागे खरंच सोन्याची सुरक्षित गुंतवणूक दडलेली आहे का? 🤔 याच प्रश्नाचं उत्तर नुकतंच SEBI (भारतीय प्रतिभूती… Continue reading
-
रक्षाबंधन विशेष: सरकारी सुरक्षा कवच
– आपल्यासाठी भारतीय सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवते आहे — जेणेकरून आपल्या आर्थिक, वैयक्तिक व सेवानिवृत्त आयुष्यातील सुरक्षिततेचे कवच निर्माण होऊ शकेल. रक्षाबंधनाच्या निमित्ताने, आपण केंद्र सरकारने भारतातील सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या काही महत्वाच्या सुरक्षा, विमा आणि बचत योजनांची माहिती घेणार आहोत — ज्यामुळे सरकारी सुरक्षेचे कवच समजून घेता येईल. आपल्या आजूबाजूच्या गरजवंतांना विशेष करून… Continue reading
-
सड़क अपघात पीडितांसाठी मोफत उपचार योजना: २०२५
– आपण SWS मध्ये, सुरुवातीपासूनच आर्थिक नियोजनाची पद्धती म्हणून ‘संपूर्ण समावेषक आर्थिक पिरॅमिड’ चा स्वीकार आणि अमंल केलेला आहे. या पद्धतीमध्ये, पिरॅमिडच्या पायथ्याशी (फाऊंडेशन) म्हणून, आपल्या कुटुंबाचा आर्थिक डोलारा ज्या मिळकतीवर उभा आहे, तिचे संरक्षण म्हणून , ‘अपघाती आणि मेडिक्लेम विमा’ आहे. या पद्धतीला बळकटी देणारी आर्थिक योजना, भारत सरकारतर्फे ५ मे २०२५ पासून जाहीर… Continue reading
-
एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा
– “शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि… Continue reading
Subscribe Here
Recent Posts
About Us
Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/
