Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


एका बँकरचे अनुभव खाते : भाग ३: थँक्यू बेटा

–

“शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा” !! क्यों…. चौंक गए?
दचकू नका. हे सहज शक्य आहे, म्हणूनच तर आम्ही लक्षाधीश आहोत. आम्ही म्हणजे आम्ही बँकर्स. अहं काही उलटसुलट किंवा वेडंवाकडं काम करून नव्हे तर रोजचं ग्राहकसेवेचं काम इमानदारीत करून. म्हणजे बघा एखाद वयस्कर, चॅलेंज्ड, अशिक्षीत ग्राहक येतो आम्ही आमच्या कामाचा भाग म्हणून काहीबाही मदत करतो आणि परतावा म्हणून लाखोंचे आशीर्वाद पदरी पाडतो.

अर्थात कधीतरी या चांगुलपणाचा फटकाही बसतो.

गोष्ट बरीच जुनी आहे, त्या दिवसांत सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते. आमचा उत्साही मित्र रमेश अगदी जगन्मित्र. कोणालाही कसलीही मदत करायला सदा तयार.

एक वयस्कर बाई यायच्या, यांना लिहिता वाचता यायचं नाही. मग कोणाकडून तरी स्लिप भरून घ्यायच्या. बहुतेक वेळा रमेश कडून. आणि अचानक एक दिवशी मोठा हंगामा. “माझ्या खात्यातले पैसे कोणीतरी काढले….. माझं खातं रिकामं झालं”. आणि मग काय … सुरु झाल्या चौकशा. शो कॉझ, मेमो नि अजून काय काय ! बाईंनी पासबुक दाखवत सांगितलं, या या तारखांना माझे पैसे काढले गेलेत. त्या त्या दिवसाची व्हाउचर्स काढून बघितली तर सगळ्यावर रमेशचं अक्षर. ब्रांचमध्ये सगळ्यांना ठाऊक होतं कि रमेश धुतल्या तांदळागत स्वच्छ आहे. उलट गरजेला कोणाला खिशातलेच पैसे काढून देईल असा सज्जन माणूस. पण सत्तेपुढे शहाणपण नसतं. शेवटी कसंबसं ते प्रकरण मार्गी लागलं.

अनेकदा बँक कर्मचारी in good faith किंवा स्वच्छ मनाने सदभावनेने मदत करतात. पुढे ग्राहकाच्या कुटुंबात फूट पडते, पैशाच्या वाटणीची प्रकरणं उदभवतात आणि त्याचे धागेदोरे काहीही कारण नसताना बँकर पर्यंत येऊन पोहोचतात. कोणाची काही चूक नसताना गोष्टींना क्वचित वेगळं वळण लागतं. या किंवा अशा प्रकारच्या काहीबाही केसेस कानावर येत असतात पण आपली आंतरिक सवय जाता जात नाही.

बँकेत परीक्षेला Practice and law of banking असा एक पेपर असतो म्हणजेच बँकिंग कायदा एक सांगतो पण प्रत्येक वेळी या कायद्यावर घट्ट बोट ठेवता येत नाही. कायदा मोडावा असं कोणी सांगत नाही पण कायद्यात अंधुक मांडलेल्या गोष्टी आपापल्या परीने ‘वाचाव्या’ लागतात, त्यांचं आपल्या परीने इंटरप्रिटेशन करावं लागतं. प्रॅक्टिसेस आपल्या पद्धतीने राबवाव्या लागतात.

असंच एक कस्टमर-आजोबा आले. वय एक्याऐंशी. नीट चालत येत नाही. एकेक अक्षर लिहिताना प्रचंड सायास पडतात, हात पूर्ण थरथरतो. बरीच वर्ष आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यांना फिक्स डिपॉझिट क्लोज करून पैसे अकाऊंटला टाकायचे होते. त्यांना म्हंटल रिसिप्टच्या मागे ‘Pl close the receipt and transfer the proceeds to my savings account no _ एवढं लिहून द्या’. जेमतेम उभं राहत त्यांनी लिहायला सुरुवात केली. मला ते बघवेना. त्यांना म्हंटल “दे दीजिए अंकलजी, मै ही लिख देती हूँ, आप सिर्फ सिग्नेचर कीजिए”. मी लिहिलं त्यांनी खूप कष्टानं सही केली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून “थॅन्क्यू बेटा” असं किमान दहा वेळा म्हंटल.


हे “थॅन्क्यू बेटा” चं ओझं हवंसंही वाटतं आणि नकोसंही.

इथे जेन्युईनली आजोबांना लिहिणं झेपत नव्हतं आणि आता आमच्या सोबत सीसी टीव्ही फुटेज असतं. मात्र आधी सांगितलेल्या गोष्टीत मदत कशी अंगाशी येऊ शकते एवढं सांगायचं होतं. एक खरा बँकर ग्राहकांना मदत करायला सदैव तत्पर असतो मात्र मदत करताना मनाच्या एका कोपऱ्यात किंचितशी भीती सुद्धा धुगधुगत असते हे नाकारता येणार नाही.

ते काहीही असो, ते पहिलं वाक्य मात्र शंभर टक्के सच.

“ शून्य गुंतवणुकीत लाखाचा फायदा मिळवा ” शेवटी कायदा काहीही असो, आपलं आपल्या संस्थेवर आपल्या ग्राहकांवर प्रेम असतं म्हणून आपण नाही आवरू शकत आपण स्वतःला, नाही बांधू शकत कायद्याच्या चौकटीत आणि ग्राहकसेवेच्या आपण निर्माण केलेल्या प्रॅक्टिसेस आपण जगत राहतो, थँक्यू बेटाच्या परड्या जड करत राहतो.

स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading