–
अलीकडेच बेंगळुरूमध्ये घडलेली एक अत्यंत दुःखद घटना ! एका उच्चशिक्षित, उच्च उत्पन्न असलेला IT व्यावसायिकाने — ज्याने परदेशात रु. ८० लाखांच्या पॅकेजवर काम केले होते त्याच्या नोकरीवर AI च्या आगमनामुळे गंडांतर आले. त्यानंतर जवळपास वर्षभर त्याला नवीन नोकरी मिळाली नाही. त्याच्यावर आर्थिक, मानसिक आणि वैयक्तिक ताण वाढत गेला. निराशेच्या गर्तेत त्याने राहत्या घरात आपले जीवन संपवले. हे समजल्याच्या अवघ्या काही मिनिटांतच, त्याच निवासी संकुलाच्या १८ व्या मजल्यावरुन उडी घेत त्याच्या पत्नीनेही आपली जीवनयात्रा संपवली.

उच्चशिक्षित, उच्चविद्याविभूषित असणाऱ्या व्यक्तींच्या हातूनही असे टोकाचे पाऊल उचलले जाणे हे सर्व आपल्याला सर्वांना विचार करायला भाग पाडते. समाजात असे वर्तन घडतांना पाहून यामागील मानसिकतेवर भाष्य करणे आर्थिक सल्लागाराच्या भूमिकेतून गरजचे वाटते.
📌 आर्थिक तणावास बळी पडून जर अशी कृती कोणाच्या हातून घडत असेल तर काय काळजी घेतली म्हणजे असा तणाव निर्माण होणार नाही किंवा त्याची तीव्रता कमी असेल ते बघुयात.
1️⃣ Income is NOT Permanent — Planning is Essential
तंत्रज्ञान झपाट्याने प्रगत होत आहे. AI, Automation च्या युगात आजची नोकरी/व्यवसाय उद्याही असेलच याची खात्री नाही. तेव्हा सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी आर्थिक नियोजनाची सुरुवात लवकर करणे आवश्यक आहे. त्यासाठी..
१) इमरजन्सी / आपत्कालीन घटनांसाठी उत्पन्नाची (६-१२ महिन्यांचे उत्पन्न ) आर्थिक तरतूद करणे
२) उत्पन्नाचे एकपेक्षा अधिक स्त्रोत तयार करणे
३) पैसा विविधीकरण (Diversification) असणाऱ्या माध्यमांत गुंतविणे
हे गरजेचे आहे. आता याकडे “पर्याय” म्हणून नाही तर जगण्याची आवश्यक साधने म्हणून पाहायला सुरुवात करायला हवी. त्यासाठी आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा.
2️⃣ Overconfidence Bias: This won’t happen to me !!
“माझे योगदान महत्वपूर्ण आहे म्हणून माझी नोकरी सुरक्षित आहे”, असे अनेकांना वाटत असतं. हा Overconfidence Bias आहे. बाजार परिस्थिती (Market) असो किंवा करिअर, तंत्रज्ञानाच्या घौडदौडीत Uncertainty ही Certainly आहेच. तेव्हा Passive Income मिळवून देणारे पर्याय/साधने/माध्यमे/ यांकडे गांभीर्यपूर्वक बघणे आणि त्याची निवड करून त्यात यश मिळवणे गरजेचे वाटते.
3️⃣ Financial Stress + Emotional Stress
वरील प्रकरणात फक्त नोकरी गेल्याचा तणाव नव्हता. व्यक्तिगत जीवनातील इतरही कारणे एकत्र येऊन परिस्थिती गंभीर बनत गेली होती. अशावेळी आर्थिक दृष्ट्यातरी भक्कम असणे परिस्थिती सावरण्यावर फार मोठा सकारात्मक फरक घडवून आणू शकते. आमच्या क्षेत्रात एक नेहेमी वापरले जाणारे ब्रीदवाक्य आठवते की, “Wealth Planning is not just numbers… it’s about emotional security.” आर्थिक नियोजन वेळीच केल्याने, योग्य केल्याने हा भक्कम आधार तुम्ही समांतरपणे तयार करत जात असता ज्यामुळे भविष्यातील इतर तणाव सुसह्य होतात.
4️⃣ Loss Aversion Bias — चुकीचे निर्णय घेण्यास कारणीभूत !
जेव्हा नुकसान होते तेव्हा आपण, चिंताग्रस्त होऊन जातो आणि त्याच्या भावनिक दडपणात चुकीचे निर्णय घेत जातो. नेहेमीच Worst-case scenario गृहीत धरण्यास Loss Aversion Bias म्हणतात. या दडपणाखाली आपल्याला परिस्थिती सुधारण्यास उपलब्ध असणारे काही पर्यायही दिसेनासे होतात. अशावेळी तटस्थपणे विचार करू शकणाऱ्या आर्थिक सल्लागाराकडे जाऊन पर्यायांवर विचारविमर्श करणे नेहेमीच शहाणपणचे ठरते. त्याच्या अनुभवाच्या, ज्ञानाच्या पोतडीतून कदाचित असे काही बाहेर येवू शकते ज्यामुळेआयुष्य उभे राहू शकते. Support System Matters !!
🔖 निष्कर्ष (Takeaway):
‘भय इथले संपत नाही !’ असे म्हणत टोकाचे पाउल उचलण्याची वेळ येऊ द्यायची नसेल तर वेळ, पॆसा हाताशी असताना त्याचे विवेकाने नियोजन करून सुरक्षित आर्थिक भवितव्य उभारण्यास हवे. आर्थिक सुरक्षेची भावना जीवनातील इतर तणाव कमी करण्यास नक्कीच मदत करते / त्यासाठी बळ देते. म्हणून सुयोग्य वेळ आणि अनुभवी आर्थिक सल्लागार वेळीच गाठा आणि आयुष्यातले भय कमी करा !!
टीम SWS
संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477

