Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


वाढते वैद्यकीय खर्च आणि आपली जबाबदारी

–

भारतात आरोग्यसेवेचा खर्च गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढला आहे. वैद्यकीय महागाईचा दर सामान्य महागाईपेक्षा जास्त असून हॉस्पिटलमध्ये दाखल होणे, शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे आणि उपचार यांचा खर्च अनेक कुटुंबांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे जात आहे. आजारापेक्षा उपचाराचा खर्च अधिक भीतीदायक वाटू लागल्याने अनेकजण उपचारच उशिराने घेऊ लागले आहेत आणि त्यामुळे अनारोग्याबरोबरच आर्थिक संकटही ओढवताना दिसते आहे. अशावेळी आपली कौटुंबिक जबाबदारी काय आहे ते जरा तपासून बघुयात.

जबाबदारी १) उपचारांचा विलंब टाळणे

अनेक रुग्ण सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करतात. डॉक्टरांकडे जाणे, तपासण्या करणे आणि औषधोपचार सुरू करणे यासाठी होणाऱ्या खर्चामुळे उपचार पुढे ढकलले जातात. परिणामी, आजार गंभीर स्वरूप धारण करतो आणि उपचाराचा खर्च अनेक पटींनी वाढतो. उदाहरणार्थ, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार किंवा कर्करोग यांसारख्या आजारांचे लवकर निदान झाले तर खर्च कमी होऊ शकतो. मात्र विलंब झाल्यास रुग्णालयात दाखल होणे, शस्त्रक्रिया किंवा दीर्घकालीन उपचार आवश्यक होतात. तेव्हा उपचारांचा विलंब टाळणे ही पहिली जबाबदारी आहे.

जबाबदारी २) आरोग्य विमा हे आर्थिक संरक्षण घेणे !

भारतात वैद्यकीय महागाईचा दर सुमारे १२% ते १४% दरम्यान असल्याचे विविध अहवालांमधून दिसून येते. याचा अर्थ काही वर्षांपूर्वी एक लाख रुपयांत होणारा उपचार आज १.४ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चिक झाला आहे. यामुळे अनेक कुटुंबांना बचत मोडावी लागते, कर्ज घ्यावे लागते, सोन्यावर कर्ज काढावे लागते किंवा मालमत्ता विकण्याची वेळ येते. प्रत्येक कुटुंबासाठी पुरेसा आरोग्य विमा (Health Insurance) आणि वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance) अत्यावश्यक आहे. आज मोठ्या शहरांमध्ये साध्या हॉस्पिटलायझेशनचा खर्चदेखील लाखो रुपयांपर्यंत जाऊ शकतो. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला अपघात झाल्यास किंवा गंभीर आजार झाल्यास विमा हा आर्थिक आधार ठरतो. आरोग्य विमा घेताना खालील बाबी लक्षात घ्याव्यात:

-कुटुंबाच्या गरजेनुसार पुरेसे विमा संरक्षण असावे.
-वैद्यकीय महागाई लक्षात घेऊन विमा रक्कम वेळोवेळी वाढवावी.
-आरोग्य विम्याबरोबर अपघात विमाही घ्यावा.
-विमा पॉलिसीची अटी, मर्यादा आणि कव्हरेज समजून घ्यावे.

जबाबदारी ३) पात्र सरकारी योजनांमध्ये सहभाग

केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत पात्र कुटुंबांना दरवर्षी रु.५ लाखांपर्यंत मोफत आरोग्य संरक्षण उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत कुटुंबातील सदस्यांना अनेक गंभीर आजारांवरील उपचारांसाठी कॅशलेस सुविधा मिळू शकते. मात्र आजही अनेक पात्र नागरिकांना या योजनेची माहिती नाही किंवा त्यांनी नोंदणी केलेली नाही. त्यामुळे पात्रता तपासणे, आयुष्मान कार्ड काढणे आणि कुटुंबीयांमध्ये जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कॅशलेस उपचारासाठी योग्य हॉस्पिटलची निवड करताना उपचारासाठी नेहमी नोंदणीकृत (Registered) हॉस्पिटल, विमा कंपनीच्या नेटवर्कमधील (Empanelled) हॉस्पिटल आणि आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट हॉस्पिटल यांची निवड करावी. यामुळे कॅशलेस उपचाराची सुविधा मिळू शकते आणि अचानक मोठी रक्कम भरावी लागण्याची वेळ टाळता येते.

जबादारी ४) वार्षिक आरोग्य तपासणी करणे
“Prevention is Better Than Cure” हे वाक्य आरोग्याच्या बाबतीत अत्यंत योग्य आहे. दरवर्षी नियमित आरोग्य तपासणी (Annual Health Check-up) केल्यास आजारांचे लवकर निदान होते, उपचाराचा खर्च कमी राहतो, गंभीर गुंतागुंत टाळता येते आणि जीवनशैली सुधारता येते. फॅमिली डॉक्टर रुग्णाचा वैद्यकीय इतिहास जाणून असतो, अनावश्यक तपासण्या टाळू शकतो, योग्य तज्ज्ञ डॉक्टरांकडे मार्गदर्शन करू शकतो, उपचारांचा खर्च कमी करण्यात मदत करू शकतो आणि दुसरे मत देऊ शकतो.

निष्कर्ष

आजार कधीही सांगून येत नाही; मात्र त्यासाठी आर्थिक तयारी करता येते. वाढत्या वैद्यकीय खर्चाच्या काळात प्रत्येक कुटुंबाने, स्वतःच्याच हितासाठी वरील जबाबदाऱ्या घेणे आवश्यक आहे.


श्री. उपेंद्र वाघ, टीम SWS (75078 82266)

संदर्भ (Resources)

  1. https://the-captable.com/2026/06/delayed-derailed-inflation-opaque-hospital-bills-pushing-indians-crisis/
  2. https://pmjay.gov.in
  3. https://nha.gov.in
  4. https://www.medicalbuyer.co.in/medical-bills-outpace-inflation-21-as-indias-healthcare-costs-spiral/
  5. https://www.financialexpress.com
  6. https://www.outlookmoney.com
  7. https://www.impactguru.com/info/how-hospital-bills-lead-to-financial-crisis-in-india/

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029