Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


बोधी आर्थिक साक्षरतेची

  • मनो-Money: भाग १४ ब्लू बुक !! – डॉ. रुपाली कुलकर्णी

      राधा आणि बाबा दोघेही कॅरम खेळता खेळता गप्पा मारत असतात. राधा: बाबा, आज एक गंमत झाली ! मी या शाळेत डबा न्यायची विसरले आणि माझ्याकडे पैसे असतानादेखील मी सारा कडून पैसे घेऊन कॅन्टीनमध्ये जाऊन जेवले !! बाबा: अरेच्चा !  असे कसे काय झाले आज ? राधा: अहो, आईने माझ्या दप्तरात “इमर्जन्सी फंड” म्हणून कायम पन्नास रुपये ठेवलेले असतात Continue reading

  • मनो-Money: भाग १३ : तुमच्या, आमच्या,….. सर्वांसाठी !! – डॉ. रुपाली कुलकर्णी

      राधा धावत येऊन बाबांना  वृत्तपत्रातील बातमी दाखविते . राधा : बाबा, आर्थिक क्षेत्रातील भरीव  कामगिरीसाठी दिले जाणारे २०१९ साठीचे  “नोबेल” पारितोषिक ,  भारतीय वंशाचे श्री. अभिजीत बॅनर्जी याना जाहीर झालेय !! बाबा :येस  राधाताई ! वाचलीय मी बातमी ! भारतीयांसाठी ही नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. त्यांनी भारतातील गरिबी दूर करण्यासाठी, सरकारला काही उपायही सुचविले Continue reading

  • मनो-Money: भाग १२ : जीवनात ही हमी .. अशीच राहू दे !! – डॉ. रुपाली कुलकर्णी

    जीवनात ही हमी ..  अशीच राहू दे आज सकाळी घरात रेडिओ चालू असताना  “जीवनात ही घडी, अशीच राहू दे ” गाणे सुरु झाले. अभ्यासात गुंग असणाऱ्या राधाला ह्या  गाण्याच्या ओळी परिचयाच्या वाटल्या  आणि मग तिचा आणि बाबांचा संवाद सुरु झाला ! राधा : बाबा हेच शब्द आपल्या शाळेसमोरील मोठ्या जाहिरात फलकावर मी पहिले ! फक्त Continue reading

  • लॉकडाऊननंतर अर्थचक्राला लवकरच गती: श्री. गुणवंत राठी (C.A.) , नासिक

      कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल. संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे ‘न भूतो’ अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सामान्य माणसाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकऱ्या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे, व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे Continue reading

  • आरोग्य विमा : अनुभव : – श्री. निखिल हरकारे

    लॉकडाऊन कालावधीमध्येमध्ये माझ्या आर्थिक सल्लागार असणाऱ्या  मित्राचा फोन आला.  सतत  लांबच -लांब चालणाऱ्या वेबिनार्स मुले  फोन स्पीकरवर टाकण्याची सवयच लागून गेली होती.  टाकला फोन स्पीकरवर ! मित्र  माझा पक्का हितचिंतक.  त्याने लगेच विचारले, “काय रे निखिल, तुझा व कुटुंबाचा आरोग्य विमा केलेला आहे का?”.  लगेच आमच्या सौ.च्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह  उमटले. “हा प्रकार  काय असतो?”, ( Continue reading

  • मनो-Money: भाग ११: आहे स्मार्ट तरिही … – डॉ. रुपाली कुलकर्णी

    संध्याकाळी शाळेनंतर घरी पोहोचताच, थालीपीठाचा खमंग वास राधाच्या नाक शिरला. चक्क बाबांना  स्वयंपाकघरात थालीपीठ करताना  पाहून राधा चित्कारली , “अरे वा , बाबा तूम्ही  ? भारीच झालेले दिसते थालीपीठ ! मला वाटले होते आज आई नाही तर आजचे जेवण मॅगीचे नाहीतर स्वीगीचे !!” यावर बाबांनी तिला हसून दाद दिली. नंतर थालीपिठावर ताव मारता मारता दोघांच्या Continue reading

  • मनो-Money: भाग १०: कर नाही तर …. : डॉ. रुपाली कुलकर्णी

    मनो-Money: भाग १०: कर नाही तर ….    “आई ग , कंटाळा आलाय  हा  आयकराचा  धडा  वाचताना ! सगळे कसे ग तांत्रिक शब्द !!” , राधा तक्रारीच्या सुरात आईला सांगत होती. आईने तिचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि म्हणाली “ते खूप सोप्पे असते ! मी सांगेन तुला समजावून नंतर.” रात्री जेवणाच्या टेबलाभोवती, आई -बाबा, राधा Continue reading

  • “Financial Pyramid ! A mandate for your Financial Health”- Mr. Raghuvir Adhikari,

    “Many many happy returns of the Taxation day !!” Surprised ? Why ? As many will start thinking “Who will happy on the Tax-Day?” Definitely it can be you, provided you mindfully plan your savings and investments in advance, considering your tax payouts. Let me explain using the Financial Pyramid shown below. Let me elaborate Continue reading

  • मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान !!

    मनो-Money: भाग ९: सुट्टी आणि अनुदान  :      रुपाली दीपक कुलकर्णी, मित्रानो, धमाल चाललीय का मग सुट्टीची ? खुप दिवसांपासून तुम्ही या सुट्टीची वाट पाहिली असेल ! पण या सुट्टीत,  तुम्ही  उन्हाळी शिबीरे, वेगवेगळे छंदवर्ग , खेळ यांच्यापलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करू शकता का ? चला विचार करू या ! समजाऊन घेऊयात एक नवीन संकल्पना “अनुदान“ अर्थात Continue reading

  • मनो-Money: भाग ८: नको तो काळा पैसा : डॉ. रुपाली कुलकर्णी

    बालदोस्तांनो, आत्ता नुकत्याच देशभरात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. तेव्हापासून घरात,टीव्हीवर,वर्तमानपत्रात सगळीकडे निवडणुकीच्याच चर्चा सुरू आहेत. कुठला पक्ष काय उद्देश ठेवून निवडणूक लढविणार, कुठून कोणता उमदेवार उभा राहणार वगैरे, वगैरे !या सगळ्या गदारोळात तुम्ही “काळा पैसा” हा शब्द बऱ्याच वेळा ऐकला असेल.  हा शब्द ऐकून तुम्ही कधी विचार केला आहे का, की काय असतो “काळा पैसा” Continue reading

  • मनो-Money: भाग ७: काय असते GST ? डॉ. रुपाली कुलकर्णी

        दोस्तहो, फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर झाला. तेव्हा घरातील मोठ्यांच्या बोलण्यात, तुम्ही अमुक कर, तमुक कर असे  असे वेगवेगळे शब्द ऐकले असतील. आज आपण आणखीन एक नवीन आर्थिक संकल्पना, गोष्टीरूपातून  समजावून  घेऊयात. ही संकल्पना आहे GST  (Goods and Service Tax) अर्थात  वस्तू आणि सेवा कर !! आजच्या आपल्या गोष्टीत आहेत दोन Continue reading

  • मनो-Money : भाग ६ : अर्थाचा अर्थ !! डॉ. रुपाली कुलकर्णी

    हॅलो बालदोस्तांनो ! या लेखमालेतील मागील सर्व लेखांमधून, आपण “अर्थ” म्हणजेच पैसा यासंबंधी बऱ्याच वेगवेगळ्या संकल्पना, गोष्टीरुपांतून समजून घेतल्या. आता यावेळी त्यातून थोडा ब्रेक घेउया !! यावेळी मी तुम्हाला मराठी साहित्या मधील सुपरिचित लेखक श्री. आचार्य अत्रे यांच्या एका कथेचा संदर्भ घेऊन, आजच्या काळाशी सुसंगत अशी गोष्ट सांगणार आहे. तिही अर्थातच “अर्था”विषयी म्हणजेच पैश्याविषयी ! Continue reading

  • मनो Money: भाग ४ :थेंबे थेंबे तळे साचे : डॉ. रुपाली कुलकर्णी

    बालदोस्तांनो Hi  !! आतापर्यंत , मनो Money च्या सदरातून, आपण पॉकेटमनी चे SMART प्लांनिंग , चक्रवाढ व्याजाचा महिमा आणि “Sooner The Better ” या संकल्पनांना, धनसंचया संदर्भात कसे वापरावे , ते  पहिले.     यावेळी  मी तुम्हाला , “थेंबे थेंबे  तळे साचे ” हा  फॉर्म्युला, धनाच्यासंबंधात कसे काम करतो , ते समजावून सांगणार  आहे !!    हा Continue reading

  • Events @ SWS, Muktangan : Dec 2018

    १ डिसेम्बर २०१८: SWS फायनान्शिअल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नासिक आणि मुक्तांगण यांच्या संयुक्त विद्यमाने “वयम वाचक कट्टा” हा उपक्रम सुरु करण्यात आला. नासिक मधील बहुश्रुत  मनोचिकित्सक, श्री. शंतनु गुणे या वेळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते.  “बालवयात तसेच किशोरवयीन काळात वाचनाचे महत्व” या विषयावर उपस्थितांशी  त्यांनी संवाद साधला. आपले वैयक्तिक वाचन अनुभव, त्यामुळे बहरलेली अभिव्यक्ती Continue reading

  • फ्री-ऑनलाइन इन्व्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म की आर्थिक सल्लागार ? : डॉ. रुपाली कुलकर्णी

    आजकाल सगळ्या  “स्मार्ट” गोष्टींची  चलती आहे  !! म्हणजे स्मार्टफोन , स्मार्टकार , स्मार्टस्पीकर वगैरे .म्हणजेच  इंटरनेटचा  वापर करून, आपले दैनंदिन काम सोपे करणाऱ्या गोष्टी !! मग आजकालची ही स्मार्ट पिढी , स्मार्ट गुंतवणुकीकडे  नाही वळली  तरच नवल !! स्मार्ट गुंतवणुक म्हणजे ऑनलाइन गुंतवणुक प्लॅटफॉर्मचा  वापर करून, तिथून मिळालेल्या (स्मार्ट??) सल्ल्यानुसार आपली गुंतवणुक करणे.  असा सल्ला देणाऱ्या Continue reading

  • सुयोग्य आर्थिक नियोजन ..अत्यावश्यक गरज : श्री. ऋषभ सोनवणे.

    नमस्कार ! आज तुमच्यासमोर आमचा  असा एक अनुभव  मांडत  आहे , ज्याद्वारे  सुयोग्य  आर्थिक नियोजन करणे किती महत्वाचे  हे  पुनः सुस्पष्ट होते आहे.  (नोंद : या लेखातील नाव बदललेले आहे. ) नाशिकमधील प्रसाद  हा  नोकरीनिमित्त दुबई राहणारा  तरुण  व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट आहे. आजतागायत बारा वर्षांपासून  तो  दुबईत कार्यरत आहे आणि  आपल्या  कुटुंबासोबत  तो दुबईतच  स्थायिक Continue reading

  • Judging the Scheme Performance? Wait, Read This !!- Mr. Neeraj Adbe

    A very common question always asked by the investors is like, “In the one year, returns on Mutual Fund Equity Investment is 10% whereas Market has grown by 20%, So why  that my investment is not performing?” Such question may arise in mind of investors which is a good sign of their activeness and alertness Continue reading

  • मनो-Money : भाग ५ : शेअरिंग , शेअर्स बद्दल : डॉ. रुपाली कुलकर्णी

    बालमित्रांनो , ह्या मागच्या काही  दिवसांत  तुम्ही  वर्तमानपत्रांमधून  “शेअर बाजार “, “स्टॉक  मार्केट”  हे  शब्द बरेचदा वाचले असतील.   कदाचीत  तुमच्या   घरातील  वडील मंडळींच्या  बोलण्यातून तुम्ही हेही  ऐकले असेल  की शेअर बाजार “वधारतो” किंवा “कोसळतो” !! तर आज मी तुमच्याबरोबर ह्या शेअर्स बद्दल थोडे शेअर करणार आहे !!   गडबडून जाऊ नका ! तुम्हाला हे काही किचकट Continue reading

  • शेअर्स , म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन पुंजीगत अधिलाभ कर : समस्या एक , समाधान अनेक : श्री. किशोर काळे

    आटपाट नगर होते. त्या नगराच्या मध्यवर्ती भागात एक डेरेदार टोलेजंग असा वृक्ष होता. त्याला रसाळ, सुमधुर अशी फळे लागत. परंतु त्या वृक्षाला मोठाले काटे होते. त्यामुळे अबालवृद्ध त्या वृक्षापासून चार हात लांबच असत, तरीही दूर परदेशातून येणार्‍या पक्षांच्या थव्यांनी तो वृक्ष नेहमी गजबजलेला असे, आजूबाजूच्या  जंगलातील माकडेसुद्धा त्या झाडाची फळे खाण्यास आतुरलेली असत. दिवसभर ती मर्कटे त्या झाडावर उच्छाद करीत. नागरिक मात्र त्या वृक्षाचे मोठाले काटे पाहून त्या पासून दूरच राहत.      एके दिवशी जंगलात तपश्‍चर्या करणारे साधू महाराज अचानक भिक्षेसाठी त्या नगरात आले. त्यांनी आपल्या तप:सामर्थ्याने त्या वृक्षाच्या सुमधुर फळांची महती जाणली व ती त्यांनी राजाला जाऊन सांगितली. ते म्हणाले, हे राजन, जो काणी या वृक्षाच्या एका सुमधुर फळाला वर्षातून एकदा खाईल त्याला पूर्ण वर्षभर कोणतीही शारिरीक व्याधी होणार नाही. त्याच्या शरीराचा र्‍हास न होता पूर्ण वर्ष तो वार्धक्यापासून दूर राहील. हा हा म्हणता ही बातमी सगळ्या नगरात पसरली. मग काय आश्‍चर्य त्या झाडाची फळे तोडण्यासाठी नागरिकांची चढाओढ सुरू झाली. ज्या झाडाकडे कोणी ढुंकूनही पाहत नव्हतं त्या झाडावर चढायला मारामारी होऊ लागली. परिस्थिती चिघळण्या अगोदर राजाने सौनिकांमार्फत ते झाड चहुबाजूंनी वेढून घेतले व फर्मान सोडले, ज्या कोणाला ह्या वृक्षाचे एक फळ खायचे असेल त्याने आपल्या एक वर्षाच्या उत्पन्नातून 10% कर राजकोषात जमा करावा. ह्या घोषणेने नागरिक अचंबित झाले. इतके दिवस ज्या झाडाची फळे अगदी सहज व फुकट उपलब्ध होती त्यासाठी आता उत्पन्नाच्या 10% इतकर कर द्यायचा? बापरे अजबच संकट आहे.      ज्या नागरिकांचा साधू महाराजांवर विश्‍वास होता ते सश्रद्ध लोक उत्पन्नाच्या 10% कर देऊन एक फळ घेण्यासाठी रांगेत उभे राहीले व उरलेले अश्रद्ध लोक मात्र त्या फळाच्या दैवी गुणांपासून वंचीत राहीले.      मित्रांनो, ह्या गोष्टीचा जर रूपकात्मक विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की, तो वृक्ष म्हणजे आपला शेअर बाजार, त्याची फळे म्हणजे मिळणारा भरघोस परतावा. त्याचे मोठे बोचरे काटे म्हणजे बाजारातील चढउतार, त्यावरील पक्षी म्हणजे परदेशी गुंतवणूकदार, माकडे आपल्या देशातील केवळ 3% गुंतवणूकदार, साधू महाराज म्हणजे सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार, राजा म्हणजे आपले सरकार व 10% कर म्हणजे सध्या बहुचर्चित असलेला दीर्घकालीन पुंजिगत अधिलाभ कर (Long  Term Capital Gain Tax) (LTCG)      सर्वसामान्य गुंतवणूकदार ह्या नवीन करामुळे भांबाऊन गेलाय. परंतु गुंतवणूकीच्या सर्व उपलब्ध पर्यायांपैकी, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात सक्षम असा पर्याय म्हणजे योग्य वापरात, योग्य वेळी केलेली दीर्घकालीन मुदतीची गुंतवणूक, म्हणूनच दीर्घकालीन गुंतवणूकीसाठी शेअर बाजाराशिवाय उत्तम पर्याय नाही. ही बाब आता भरतीय जनतेला पटत असून त्यामुळेच शेअर बाजारात गुंतवणकीचा ओघ वाढला असून, म्युच्युअल फंड योजना व विमा योजना यांच्यामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. या वाढत्या गुंतवणुकीमुळे शेअर बाजार निर्देशांक सध्या नवीन उच्चांक गाठत असून, त्या वाढत्या गुंतवणुकीचा फायदा सरकारला सुद्धा व्हावा म्हणूनच 10% दीर्घकालीन पुंजिकृत अधिलाभ कर  (LTCG Tax) लावण्यात आलेला आहे.      आता गुंतवणूकदारांकडे ह्या नव्या करांचे नियोजन करण्यासाठी कोणते पर्याय आहेत  हे पाहू. पर्याय क्रमांक 1      सध्याच्या व्यवस्थेत हा कर नवा असला तरी अगदीच नवखा नाही, शेअर्स वर सप्टेबर 2004 च्या पुर्वी असा कर अस्तित्वात होता, 2004 नंतरच्या काळात हा कर पूर्णपणे रद्द करण्यात आला. त्याचा हेतू गुंतवणूकदारांना शेअर बाजाराकडे आकर्षित करणे हाच होता. नजीकच्या काळात बाजारात येणार्‍या पैशाच्या वाढत्या ओघामुळे सरकारने शेअर्स व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर कमावलेल्या दीर्घकालीन भांडवली नफ्यावर 10% इतका कर पुन्हा लावण्यात आला आहे. ह्यात काळजीचे काहीच कारण नाही कारण हा कर केवळ कमावलेल्या नफ्यावरच आकारला जाणार आहे. तोही केवळ 10% इतकाच. आता कराला कमीत कमी जर करायचे असेल तर वॉरेन बफेट यांच्या तत्त्वानुसार योग्य शेअर घ्या व घट्ट धरून बसा  (Buy Right Sit Tight) अशी दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास आपल्याला आपले भांडवल अनेक पटींनी वाढवता तर येईलच व ह्या कराला आपल्या गुंतवणुकीपासून दूर सुद्धा ठेवता येईल. थोडक्यात ह्या कराला तुम्ही पोस्टपोन करू शकाल.      म्युच्युअल फंडाच्या लाभांशावर देखील 10% कर नव्याने लादला असून ह्या मुळे आता म्युच्युअल फंडाच्या डिव्हीडेंड ऑप्शन स्कीमपेक्षा ग्रोथ ऑप्शन स्कीम्समध्ये निवेश करणे फायद्याचे ठरेल. अनेक बँक कर्मचारी व काही म्युच्युअल फंड वितरक बँकांचे व्याज दर कमी झाल्यामुळे फिक्स्ड् डिपॉजिटमध्ये गुंतवणूक करण्यात आलेल्या गुंतवणूकदारास महिना 1% लाभांशाचे आमिश दाखवत बॅलन्स फंडाच्या डिविडंड ऑप्शनमध्ये गुंतवणूक करण्यास भरीस पाडत आहेत. सध्या बॅलन्स फंडानी 7% ते 75% इतकी गुंतवणूक शेअर्समध्ये केलेली आहे. त्यामुळे ते धोक्याच्या उच्चतम पातळीवर आहेत व भाबडे गुंतवणूकदार या धोक्यापासून बेसावध असून त्यांना या चुकीच्या विक्री तंत्राचा फटका पडू शकेल. या विचित्र परिस्थितीतून सावरण्यासाठी व लाभांशावरील कर वाचवण्यासाठी डिविडंड ऑप्शन मधून ग्रोथ ऑप्शनमध्ये येणे क्रमप्राप्त होणार आहे.      दीर्घकालीन गुंतवणूक करताना बाजारातील उद्योगांना चांगले समजून घेऊन त्यावर बारीक नजर ठेवणे गरजेचे आहे. जर आपल्याकडे ही समज व वेळ नसेल तर हे काम चांगल्या सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागाराच्या हाताने देणे केव्हाही श्रेयस्कर      शेवटी कान हे सोनारानेच टोचलेले बरे, नाही का?   पर्याय क्रमांक 2      दीर्घकालीन गुंतवणूक जरी फायद्याची असली तरी योग्य मालमत्तेचे नियोजन  (Asset Allovation) केल्याशिवाय गुंतवणूक करणे सोयीचे नाही, या नवीन कर प्रणालीमध्ये गुंतवणूकदारास शेअर्स व इक्विटी म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन कॅपिटल गेनवर दरवर्षी 1 लाख रूपयाची सूट देण्यात आलेली आहे. यामुळे जर आपण दरवर्षी आपल्या एकूण ईक्विटी नफ्यातून 1 लाख इतका नफा जर डेट फंडामध्ये जमा करीत राहिली तर आपसूकच असेट अलोकेशन होईल व आपला नफा वळत करून घेता येईल. फक्त हे करीत असताना ही सूट आपल्या संपूर्ण गुंतवणूकीवर एकत्रितपणे घ्यावी लागेल.      अनेकदा गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वेगवेगळ्या मध्यस्थ्या  (Distributors) मार्फत गुंतवत असतात. त्यामुळे त्यांना एकत्रितपणे नफा ठरविणे कठीण जाईल व ही सूट घेताना चुक होऊ शकेल. यावर उपाय म्हणजे चांगल्या निष्णात सेबी अधिकृत सल्लागाराकडे आपली संपूर्ण गुंतवणूक सोपविणे व त्याची फी देऊन त्याच्याकडून (Direct NAV) चा लाभ घेणे, ज्यामुळे गुंतवणूकीच्या खर्चात जवळ जवळ 1% ते 1.25% इतकी बचत होऊन जास्त परतावा मिळेल.   पर्याय क्रमांक 3 :      नव्या करप्रणालीत 10% (Long Term Capital Gain) हा कर जरी लागलेला असला तरी त्याचा मोठा बाऊ करण्याची काही गरज नाही. अर्थ मंत्र्यांच्या मते भारतात केवळ 3% लोक शेअर बाजार व म्युच्युअल फंडात गुंतवणूक करतात. हेच लोक शेअर बाजारातील उद्योगांवर मालकी हक्क प्रस्थापित करतात. त्यामुळे त्यांना भरपूर नफा कमविता येतो. ह्या नफ्यावर जर 10% कर लावला तर त्यात अन्याय तो कोणता? खरंतर हे आधी कमवा व मग द्या असाच आहे नाही का.        शहाण्या गुंतवणूकदाराने या नव्या कराचा बाऊ न करता केवळ योग्य मालमत्ता वाटप (Asset Allocation) करून  येणारा कर जर शांतपणे भरून टाकला तर त्याला कोणतीही काळजी करण्याचे कारणच नाही. त्याच प्रमाणे आपल्या एकूण नफ्यात वाढ करण्यासाठी म्युच्युअल फंडाच्या (Direct Plans) मध्ये सेबी अधिकृत सल्लागाराच्या मार्गदर्शनाने गुंतवणूक करावी व त्यालाच योग्य फी देऊन गुंतवणुकीवर देखरेख करून योग्य (Asset Allocation) करण्यास नेमावे. यामुळे त्यांची गुंतवणूक योग्य रीतीने वाढून भविष्यात चांगला परतावासुद्धा मिळेल. म्हणतात ना उद्योगाचे घरी लक्ष्मी नांदे परोपरी, परंतु ज्यांना हे समजून उमजून करता येणार नाही त्यांचे भविष्यात नुकसान होऊ शकेल, आणि त्यांना हेच म्हणावे लागेल की अडाण्याची मोळी अन् भलत्यालाच मिळी.                                                            Continue reading

  • पॅन कार्ड चे महत्व: श्री. ऋषभ सोनवणे

    पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकाउंट नंबर. पॅन क्रमांक म्हणजे भारतीय नागरिकाची ओळख. यात दहा आकडी क्रमांकामध्ये अक्षरे व अंकांची जळवणुक असते. भारतीय आयकर कायदा 1961, अंतर्गत सर्व भारतीयांना पॅन आयकर विभाग देतो. यासाठी केंद्रीय कर मंडळांतर्गत तरतूद आहे. भारतीयांप्रमाणे परदेशी नागरिकांना ही दिले जाते. पण त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.आर्थिक व्यवहार करताना असणे Continue reading

Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/