Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


एका बँकरचे अनुभव खाते : भाग १९: आमच्याही डोळ्यात पाणी

–

पब्लिक सर्व्हिस म्हणजेच सेवा क्षेत्रात काम म्हणजे शरीर मेंदू हृदय सगळ्याचा ताळमेळ सांभाळत करावी लागणारी तारेवरची कसरत.त्यात भावना वगैरे मध्ये आल्या की तर सावरणं आणखी अवघड.


त्या दिवशी एक एंट्री चुकीची मारली गेली, पैश्याच्या हिशेबाने पाहिले तर रक्कम अगदी थोडकी होती म्हणून निभावलं. असं सहसा होत नाही, ‘स्मिता लक्ष देऊन काम कर,पुन्हा असं होता कामा नये’, असं स्वतःला बजावलं. नेहमीच्या सवयी प्रमाणे काय झालं आणि का झालं असावं याचा आढावा घेतला आणि स्वतःला स्पष्टीकरण दिलं, bad figure होती म्हणून चूक झाली. स्वतःला सांगितलं खरं पण तेवढसं पटलं नाही.
कारण केवळ bad figure हे एकच कारण नव्हते. बॅड फिगर म्हणजे स्पष्ट वाचता न आल्यामुळे चुकीचा आकडा वाचणे किंवा लिहिणे. पण बॅड फिगर हे कारण अजिबात नव्हतं, तर डोकं थाऱ्यावर नव्हतं हे त्याचं खरं कारण.


झालं असं कि आमच्या एक डॉक्टर ग्राहक त्यांच्या सुनेबरोबर आल्या. दोघी एकमेकींशी नॉर्मल बोलत होत्या. डॉक्टरबाईंनी काउंटरला येवून सांगितले, तीन महिन्यापूर्वी त्यांचा नवरा (तोही डॉक्टर) वारला. डेथ सर्टिफिकेट वगैरे फॉर्मालिटीज झाल्या, नवऱ्याचे नाव कमी करणे आणि सुनेचे नाव ऍडकरण्यासाठी त्यांनी फॉर्म्स दिले. आमचे काम होईस्तोवर दोघी समोर बसल्या.


काम करता करता माझं लक्ष गेलं तर डॉक्टर मुसमुसून रडत होत्या. मघाशीच मी आणि माझी सहकारी एकमेकींना म्हणालो ‘बरं सावरलंय ना डॉक्टरीण बाईंनी स्वतःला’.. आणि आता हे. सून शांतपणे प्रेमाने त्यांची समजूत काढत होती.

मी आणि माझी सहकारी आतून हललो. टेबलावरची कामं चालू होती पण लक्ष त्या दोघींकडे होतं. एखाद्या व्यक्तीचं जाणं हे फक्त स्क्रीनवरून त्याचं नाव डिलीट करणं नसतं तर त्या सोबत बांधलं गेलेलं बरंच काही असतं.


ऑफिसमध्ये कर्तव्य म्हणून जरी आम्ही हे काम करत असलो तरीही बरेचदा आम्हीही त्यात गुंतलेले असतो, आणि एखाद्या व्यक्तीच्या जाण्यापूर्वीचे यातनामय दिवस प्रत्यक्ष नसले तरी आम्हीही सोसलेले असतात.


डॉक्टरसाहेबांचे नाव डिलीट झाले हे डॉक्टर बाईंना सांगण्याचे धैर्य आम्हा दोघींमध्ये नव्हते. थोड्या वेळाने बाई शांत झाल्या, आपले पासबुक घेऊन थँक्स म्हणून गेल्या. Take care शिवाय मी आणखी काय म्हणू शकत होते! बाई आणि त्यांची सून गेल्या. आम्ही मात्र त्यातच गुंतून राहिलो.


एरव्ही काही अमेंडमेंट केली तर मी फ्रेश पेज प्रिंट करून देते आणि ग्राहकाला सांगते “पासबुक देख लो, अभी सब ठीक है ना !”आज मात्र मी हे बोलण्याचे धाडस करू शकत नव्हते. माणूस जातो, लोकांसाठी किंवा नातेवाईकांसाठी ती ‘अरेरे’ची भावना असू शकते, मात्र त्याच्या सहचरासाठी ती खूप आतून पिळवटून टाकणारी, शब्दात सांगता न येणारी ठसठस असते.आणि आमच्यासाठी सुद्धा मन विचलित करणारं बरंच काही.


बँकर-ग्राहक बंध एवढे सुंदर असतात कि ग्राहक बरेचदा त्यांच्या नाजूक गोष्टी सुद्धा आमच्या सोबत विश्वासाने शेअर करतात, प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या समस्येवर आमच्याकडे तोडगा असेलच असे नाही पण ‘माझं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतंय’, हा मोलाचा आधार तर नक्कीच असतो. आणि ग्राहकाचे दुःख बघून आमच्याही डोळ्यात कित्येकदा पाणी तरळतं बरं !


स्मिता गानू जोगळेकर.
9892551950
smita_dj@hotmail.com


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading