Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


हर ख़्वाहिश पे दम निकले ….

–

छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकतीच घडलेली हृदयद्रावक घटना संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारी आहे. या घटनेमागील नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. तरीही यासम अनेक घटना आपण आजूबाजूस घडतांना बघत आहोत. महागड्या वस्तूंसाठी आयुष्य पणाला लावणारी तरुण पिढीची मानसिकता मन अस्वस्थ केल्याशिवाय राहत नाही. ही घटना झाल्यानंतर मनात जे विचार आले ते मांडण्याचा हा प्रयत्न !

१) गरज आणि इच्छा यातील फरक समजून घेऊयात ! (कदाचित कळतेय … पण वळतेय का ?)

मिर्झा गालिब यांची एक प्रसिद्ध गझल आहे, त्यातरील एक शेर आठवला.

हज़ारों ख़्वाहिशें ऐसी कि हर ख़्वाहिश पे दम निकले
बहुत निकले मिरे अरमान लेकिन फिर भी कम निकले।

याचा अर्थ असा कि माणसाच्या इच्छा इतक्या असंख्य असतात की प्रत्येक इच्छा पूर्ण करतांना तो आपले आयुष्यच पणाला लागतो. आणि त्यातील अनेक इच्छा पूर्ण झाल्या तरी जीवनात आपले मन काही तृप्त होत नाही आणि आपण मनातील इच्छापूर्तीसाठी आयुष्यभर धावतच राहतो ! खरेच आहे. गरज आहे ती या इच्छापूर्तीच्या दमछाक प्रवासात थोडे थांबून विचार करण्याची की ही अमुक एका वस्तूची (किंवा घटनेची) इच्छा म्हणजे माझी निकडीची गरज खरचं आहे का ? खरचं आवश्यकता नसलेल्या वस्तूसाठी मी माझे पैसे, वेळ, ऊर्जा तर खर्ची घालत नाहीये ना ? या इच्छापूर्ती मागे धावताना आपण मोजत असलेली प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष किंमत आपले आर्थिक, मानसिक स्वास्थ्य बिघडवते आहे का ? त्यापायी आपण सतत दडपणात जगतोय का ? यासारख्या प्रश्नांचे उत्तर जर ‘हो’ येत असेल तर नक्कीच आपण आपल्या अशा इच्छांना मुरड घालणे गरजचे असते.

Crux: Work for your needs and not for your wants ! Wants are not urgent, they can be planned !

२) खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या हव्यासापोटी आयुष्याचे सौख्य हरवते आहे.

सोशल मीडियाच्या अतिप्रभावामुळे, आपल्या जीवनात जाहिरातदारांचा अतिशिरकाव झाल्यामुळे, इतरांच्या समृद्ध जीनवाचा अनावश्यक प्रभाव पाडून घेतल्यामुळे आपण आपले आयुष्य जगण्याची प्रत अनेकदा वास्तवापेक्षा वरची बघायला लागलो आहोत. आपण कोणत्या वस्तू वापरतो, कोणत्या ब्रँडचे कपडे /शूज/ गाडी वापरतो, कुठे फिरायला जातो, कोणत्या हॉटेलमध्ये खातो या गोष्टी नकळत सामाजिक प्रतिष्ठेशी जोडल्या जात आहेत. आणि खिशाला न परवडणाऱ्या या आभासी प्रतिष्ठेच्या मागे धावताना आपण आपले आर्थिक गणित जामच बिघडवतो आहोत. इतरांच्या जगण्याची तुलना आपल्या जगण्याशी करणे तात्काळ थांबवायला हवे आहे. वाचन, कलांचा अनुभव, नात्यांची श्रीमंती, कुटुंब आणि छंदांसाठी भरपूर वेळ अशा पैशात न मोजता येणाऱ्या अनेक गोष्टी आहे ज्या जीवनाची प्रत अनेक पटींनी उंचावतात. मग सुखी-समाधानी जीवनाची पायवाट सोडून आपण खोट्या सामाजिक प्रतिष्ठेच्या महामार्गास का जावे ? हा विचार आपण आपल्या जीवनशैलीत रुजवायला हवा, आपल्या मुलांना द्यायला हवा. इथे ‘दात कोरून पोट भरावे’ असे माझे अजिबात म्हणणे नाहीये. पण पोट भरलेले आहे तर उगा पळापळ का ? याची शहाणीव असणे महत्वाचे आहे. (अशावेळी आठवते ते देशाच्या सर्वोच्च पदाला गवसणी घालणाऱ्या स्व. अब्दुल कलामांचे साधे राहणीमान !)

Crux: जीवनाचे सौख्य नक्की कशात सामावले आहे, हे समजून घेऊन आयुष्याच्या वाटेवर चालूयात.

३) गरज.. आर्थिक संस्कारांची : आपल्यावर आणि आपल्या पाल्यांवर !

आपल्याला काय परवडते आणि काय नाही याचे चित्र आपल्या आणि आपल्या मुलांच्या मनात स्पष्ट हवे. त्यासाठी कुटुंबांमध्ये मोकळा आर्थिक संवादही व्हायला हवा ज्याद्वारे आपल्या कुटुंबाचे आर्थिक चित्र घरातील सर्वच व्यक्तींना उमगते. मुलांच्या संवेदनशील मनांवर उत्तम संवादाच्या, आलेल्या अनुभवांच्या, नेटक्या उदाहरणांच्या माध्यमाद्वारे हे अर्थ संस्कार वेळीच झाले तर मुले उगा हव्यास करण्याच्या मार्गाला जाण्याची संभावना नक्कीच कमी होते. त्यांनाही आपली आर्थिक जबाबदारी समजू लागते आणि ते विचारपूर्वक खर्च करायला लागतात असा आमचा अनुभव आहे. गरज आहे..आर्थिक संस्कारांचे महत्व ओळखण्याची आणि ते वेळोवेळी घडविण्याची.
Crux : मुलांना पैसा नाही तर आर्थिक शहाणपण देऊयात, पैसा त्यामागूनच चालत येतो.

तेव्हा ‘हजारो ख़्वाहिशों की कोई सीमा नहीं, मगर आमदनी की होती है।’, हे लक्षात घेऊन हर एक कुटुंबात अर्थ संस्कार झाले तर छत्रपती संभाजीनगरसारख्या वरील घटना बहुदा घडणार नाहीत.


डॉ . रुपाली कुलकर्णी,
टीम SWS.


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Fintech Services Pvt. Ltd. – Your Trusted Partner in Financial Well-being!

Established in 1995, SWS has been committed to empowering individuals, families, and businesses through sound investment services. With over three decades of experience, our team of qualified financial professionals brings together expertise in investment services.

At SWS, we believe that financial success is built on informed decisions, disciplined investing, and long-term relationships. Our goal is to simplify financial complexities, enhance financial literacy, and help our clients confidently pursue their financial aspirations.

Through this blog, we share insights, practical tips, and perspectives to help you make informed financial decisions.

Explore more about us at: https://www.swsfspl.com/

SWS Fintech Services Pvt Ltd
AMFI Registered Mutual Fund Distributor- ARN- 90746
ARN Renewal Date- 25th July 2028
APMI Registered Distributor- APRN01157
APRN Renewal Date- 11th Jan 2029

Discover more from Money चे अंतरंग

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading