–
केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता जीवन विमा आणि आरोग्य विमा पॉलिसींवरचा १८% GST काढून टाकला जाणार आहे. म्हणजेच २२ सप्टेंबर २०२५ पासून विम्याचे प्रीमियम स्वस्त होणार.

याचा अर्थ काय?
आज ₹२०,००० चा प्रीमियम भरताना १८% GST म्हणजे ₹३,६०० जास्त द्यावे लागत होते. नवीन नियम लागू झाल्यानंतर हे अतिरिक्त पैसे द्यावे लागणार नाहीत.
पण महत्त्वाचं काय?
२२ सप्टेंबरची वाट पाहत पॉलिसी रिन्यू न करणे धोक्याचे आहे.
कारण –
– मृत्यू, आजारपण किंवा अपघात GST कमी कमी होण्याची वाट बघणार नाहीत. (आणि तो कमी झाल्यावरही थांबणार नाहीत!)
– मृत्यू, आजारपण हे कधीही , कुठेही , कोणाबरोबरही शक्य आहेत.
– तोपर्यंत पॉलिसी रिन्यू करण्यात चालढकल म्हणजे, थोड्या फायद्यासाठी मोठ्या नुकसानाला आमंत्रण !!
आपल्यासाठी योग्य पाऊल काय ठरेल ?
👉 आपल्या जीवन विमा, आरोग्य विमा आणि अपघात विमा पॉलिसी वेळेवरच रिन्यू करा.
👉 GST सवलत मिळाली तर ती बोनससारखी समजा, पण मुख्य गोष्ट म्हणजे वेळेत संरक्षण मिळणे आवश्यक आहे.
✅ थोडक्यात: विमा स्वस्त होणार ही चांगली बातमी आहे, पण जीवाची व आरोग्याची सुरक्षा थांबवता येत नाही. “फायदा थांबू शकतो, पण धोका थांबत नाही.”
टीम SWS

