–
आजच्या गतिशील युगात बर्याच कामगारांना, कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी रस्त्यांवरील भयानक ट्रॅफिक, बेशिस्त वाहनचालक आणि अशा अनेक धोकादायक परिस्थितींचा सामना करत कामाचे ठिकाण/ऑफिस गाठावे लागते (work commutes). १९ जुलै २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने असा निकाल दिला आहे की ‘कामावर जाताना किंवा परतताना होणारे अपघात’, आता ‘कामाच्या ठिकाणी झालेल्या दुखापती’, असे म्हणून पात्र ठरतील. हा निर्णय अनेक श्रमिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार देणारा ठरू शकतो.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा तपशील : (Legal Context)
महाराष्ट्रातील एका साखर कारखान्यात वॉचमन म्हणून काम करणाऱ्या कै. शाहू संपतराव जाधवर, यांच्याशी संबंधित एका प्रकरणात हा निकाल देण्यात आला. २२ एप्रिल २००३ रोजी त्यांची शिफ्ट पहाटे ३ ते सकाळी ११ अशी होती. पहाटे कामावर जात असताना, कारखान्यापासून सुमारे ५ किमी अंतरावर त्यांची मोटरसायकलला भीषण अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे त्यांची विधवा पत्नी, चार मुले आणि आई होती. त्याच्या पत्नी आणि चार मुलांना ₹३,२६,१४० + १२% वार्षिक व्याज अशी मदत देण्यात आली. परंतु उच्च न्यायालयाने अशी मदत नाकारली. न्यायालयाने Employees’ State Insurance Act (ESI), Section 51E (2010) मधल्या commuting accident च्या स्पष्ट व्याख्येकडेही लक्ष वेधले. त्याचा आणखी व्यापक, लाभकारक अर्थ Employees’ Compensation Act मध्ये लागू होऊ शकतो म्हणून या निर्णयास आधार दिला.
या निर्णयामागील आर्थिक व्यवस्थापनाचे धडे
जोखीमाचे व्यवस्थापन (Risk Management): आपण मिळणाऱ्या कमाईचा किती भाग आपत्तीनिवारक निधी (Emergency Fund) म्हणून ठेवलेला आहे हे तपासा.
नुकसानातही स्थैर्य (Financial Resilience): अशा आकस्मिक परिस्थितींमध्ये, मृत्यू पावणाऱ्या व्यक्तीची विमा पॉलिसी नसल्यास कुटुंबाला मोठा आर्थिक धक्का बसू शकतो. त्यामुळे योग्य अपघाती आणि जीवन विमा कव्हरेज असणे आवश्यक आहे.
संस्थांचे अंतर्गत व्यवस्थापन: संस्थांनी / ओद्योगिक कंपन्यांनी Commuting Accidents साठी स्पष्ट सूचनांची व्यवस्था ठेवावी. तसेच कर्मचार्यांना याबद्दल, पुरेशी सुरक्षा घेण्याबद्दल जागरूक करावे.
सारांश
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णायक निकालामुळे commutes मध्ये होणारे अपघात फक्त ‘सडक दुर्घटना’ नसून कामाशी संबंधित दुखापत म्हणून ओळखले जाणार आहेत. असे असले तरीही आर्थिक नियोजन (जसे की गुंतवणूक, बचत, आपत्ती निधी आणि समर्पक विमा) हे घटक प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यावश्यक आहेत. तसेच, या निर्णयामुळे नियोक्ता (employer) आणि राज्यव्यवस्था या दोन्ही स्तरांवर, रोजगार सुरक्षा प्रक्रिया ही commuting पर्यंत विचारात घेतली जाताना दिसते आहे.
टीम SWS

