बाजाराचे चढ-उतार ! 💹

चढ-उतार हे बाजाराचे, निसर्गाचे जसे ऋतू, 💹
एक सरता, दुसरा येतो, सतत गुंतवत राहा तू ! 💰
गुंतवणुकिची ध्येये ठरता, चित्त न व्हावे तुझे विचलित,😕
संयम, शिस्त बाळगता तू, ध्येयपूर्ती होइल खचित ! ✅
भाव वाढती, भाव उतरती, काळाचा तो खेळ रे, 🎲
धैर्याने टिकून राहणे, शिस्त सदा तू पाळ रे! 🤞🏼
भीतीने जरा मागे सरता, संधी सुटते हातातून,😨
चक्रवाढीची जादू विरते, फरक दिसतो प्राप्तीतून ! ⏬
संयम धरून थांबला जो, पाहू शकला समृद्धी, 🔝
बाजाराचा इतिहास सांगे, ठेवावी ही सुबुद्धी !😊
SIP असो की एकरकमी, ठाम ठेव तुझा ठेवा, 💲
गडगडला बाजार जरिही, दोष न द्यावा तू दैवा ! 😤
उतार येता बाजारात, कर गुंतवणुक अधिक विकसित, ⬆️
निती ही सदा बाळगून, कर भविष्य सुनिश्चित ! 👍🏼
अनुभवी सल्लागार पाठिशी, मग काळजी नको मनी, 🤩
SWS अर्थवाणी रे , रुजवी शहाणपण हेच जनी! 😇
SWS अर्थवाणी – चरण १: मालमत्ता नियोजन (Estate Panning) : https://swsfspl.blog/2020/10/05/arthwanee1/
SWS अर्थवाणी – चरण २: आयुर्विमा (Life Insurance) https://swsfspl.blog/2020/10/05/arthwanee2/
SWS अर्थवाणी – चरण ३: ब्लु-बुक (Blue Book ) https://swsfspl.blog/2021/11/12/arthwanee3/
SWS अर्थवाणी – चरण ४: आर्थिक नियोजन (Financial Planning ) https://swsfspl.blog/2021/11/19/arthwanee4/
SWS अर्थवाणी – चरण ५: आपत्कालीन निधी ( Emergency Fund ) https://swsfspl.blog/2022/11/25/arthwanee5/

डॉ. रुपाली कुलकर्णी,
Head: IT , Contents & Training
SWS Financial Solutions Pvt. Ltd.
