सायबर गुन्हेगारी प्रकार – भाग १६
सोशल मीडियाचं जग वेगाने बदलतंय. अलीकडेच Meta (Instagram) ने एक नवं फीचर सुरू केलं आहे — AI Voice Translation आणि Lip-Sync!
म्हणजेच, AI द्वारे तुम्ही जे काही बोलता ते दुसऱ्या भाषेत अनुवादित केलं जाईल आणि तुमच्या ओठांची हालचालही त्या भाषेशी जुळवली जाईल. थोडक्यात सांगायचं, तर आता “AI Dubbing Studio” आपल्या मोबाईलवरच आला आहे! ही क्रिएटर्स साठी एक चांगली संधी आहे. पण तंत्रज्ञानाचा गैरवापर करणाऱ्या सायबर गुन्हेगारांसाठी यामुळे फसवणुकीचे नवीन दार उघडलं गेलं आहे ! कसे ते समजावून घेऊयात ..
उदाहरण: समजा एखाद्या आईला रात्री तिच्या मुलाचा/मुलीचा फोन आला की “आई, मी जरा अडचणीत आहे, मला तात्काळ ३००० रु पाठव.” आवाज अगदी मुलासारखाच — आणि भावनिक आवाहन ! कुठलीही आई लगेच पैसे ट्रान्सफर करणारच . पण नंतर लक्षात येऊ शकते की तो फोन तिच्या मुलाचा नव्हताच. तर AI ने मुलाचा आवाज क्लोन करून तो Deepfake कॉल तयार केला होता आणि त्याला बळी पडून सायबर गुन्हेगारांचे खिसे भरले गेले !
हे उदाहरण आपल्याला याची जाणीव करून देते की तंत्रज्ञान जितकं शक्तिशाली, तितकंच ते धोकादायकही ठरू शकतं.
ही सुविधा अनेक कंटेंट क्रिएटर्ससाठी वरदान ठरू शकते.
🎬 क्रिएटर्ससाठी सुवर्णसंधी
✅ भाषेचे अडथळे संपले आहेत: आता मराठी क्रिएटर इंग्रजीत बोलू शकतो, अमेरिकन क्रिएटर हिंदीत – त्यामुळे तुमच्या एकाच व्हिडिओद्वारे तुम्हाला जगभरातील ग्राहक/प्रेक्षक यांच्यापर्यंत पोहोचण्याची संधी वाढली आहे.
✅ तुमच्या आवाजाची ओळख टिकवून भाषांतर: AI तुमच्या आवाजाचं टोन कायम ठेवत तुमच्या कन्टेन्टचा अनुवाद करतो – त्यामुळे “तुमचाच आवाज” दुसऱ्या भाषेत ऐकायला मिळतो. तुमच्या कन्टेन्टला तुमचा Personal Touch कायम रहातो.
✅ प्रोफेशनल दर्जाचे Reels / Videos तयार करणे शक्य झाले आहे: आता डबिंग स्टुडिओ, व्हॉइस आर्टिस्ट किंवा सबटायटल्सशिवायही ग्लोबल ऑडियन्सपर्यंत पोहोचता येणे शकय झाले आहे.
✅ ब्रँड सहयोग आणि मार्केटिंगसाठी नवा मार्ग उघडला आहे: एकच कंटेंट अनेक भाषांत – म्हणजे एकच व्हिडिओ वेगवेगळ्या बाजारपेठांसाठी वापरता येणे शक्य आहे. ज्यामुळे अनेक संस्था, माध्यमे एकत्र जोडले जाऊ शकतात. उदा. तुम्ही केलेला सायबर जागरूकतेचा प्रभावशाली व्हिडीओ रशियन भाषेतील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमा अंतर्गत दाखविला जाणे !
⚠️ या सुविधेचा गैरवापर सायबर गुन्हेगारही करू शकतात. AI आता केवळ भाषांतर करत नाही – तर तुमचा आवाज आणि चेहरा दोन्ही “क्लोन” करतो. आणि याच ठिकाणी सुरू होतात Deepfake कन्टेन्टचे धोके.
🕵️♀️ Deepfake म्हणजे काय?
Deepfake म्हणजे AI तंत्रज्ञानाचा वापर करून कोणाच्याही चेहऱ्याची, आवाजाची हुबेहुब नक्कल तयार करणे. हे बनावट व्हिडिओज इतके वास्तवदर्शी असतात की त्यातील व्यक्ती खरी की खोटी हे ओळखणं कठीण असतं. आता जर हे तंत्रज्ञान सोशल मीडिया अँप्समध्ये थेट उपलब्ध झालं, तर काही सेकंदात कोणीही “तुमच्या नावाने” काहीही बोलणारा व्हिडिओ तयार करू शकतो.

💣 संभाव्य सायबर फसवणुकीचे प्रकार
ओळख चोरी (Identity Theft) होण्यासारखे धोके वाढले आहेत: तुमचा आवाज व चेहरा वापरून बनावट खाते तयार करणे शक्य झाले आहे ज्याचा वापर करून एखाद्याची आर्थिक फसवणूक करणे शक्य झाले आहे.
एखाद्याची सामाजिक प्रतिमा खालावण्यासाठी Reputation Attack: खोटे व्हिडिओ पसरवून प्रतिमा खराब करणे हा एक मोठा धोका तयार झाला आहे.
आर्थिक फसवणूक (Fraud Calls): AI-voice वापरून ओळखीच्या व्यक्तीचा आवाज तयार करून इतर कोणाकडे पैसे मागणे किंवा फेक कॉल्स करणे यासारखे प्रकार खूप वाढले आहेत.
Fake News / Misleading Content: प्रसिद्ध व्यक्तींना चुकीच्या विधानांशी जोडण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो..
AI चं सामर्थ्य मोठं आहे, पण त्याचं नियमन आणि सुरक्षा तितकीच आवश्यक आहे. खबरदारी घेणे आपल्या हातात आहे.
उपाययोजना:
🔒 आपला डेटा सुरक्षित ठेवा: तुम्ही कोणत्या अँपला माईक, कॅमेरा किंवा चेहरा स्कॅनिंगची परवानगी देताय, यावर लक्ष ठेवा.
⚠️ नव्या फीचरचा वापर समजून-उमजून करा: प्रयोग करताना स्वतःचे संवेदनशील क्लिप्स किंवा आवाज अपलोड करू नका.
🧭 फॅक्ट-चेक करा: कोणताही व्हिडिओ खरा आहे की Deepfake, हे तपासण्याची सवय लावा.
💡 निष्कर्ष
AI Translation आणि Lip-Sync सारखी साधनं क्रिएटर्ससाठी संधी निर्माण करतात, पण त्याच वेळी सायबर फसवणुकीचं नवं युग सुरू करत आहेत. म्हणूनच प्रत्येक वापरकर्त्याने तंत्रज्ञानाचा वापर जागरूक राहूनच करावा — कारण डिजिटल युगात तुमचा चेहरा आणि आवाज तुमची “Digital Signature” आहेत.
टीम SWS

