Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


पॅन 2.0 : माहिती आणि अर्ज प्रकिया

पर्मनंट अकाऊंट नंबर म्हणजे PAN कार्ड ही सुविधा १९७२ पासून अंमलात आणली गेलेली आहे. नुकतीच केंद्र सरकारने PAN 2.0 च्या नवीन एडिशनला मंजुरी दिली आहे. यामुळे देशातील सुमारे ७८ कोटी लोकांना आता आपले PAN कार्ड बदलावे लागणार आहे. या प्रक्रियेसाठी सरकारतर्फे ₹ १४३५ कोटी खर्च केले जाणार आहेत. भारत सरकारच्या आयकर विभागाने ज्या PAN 2.0 ला मंजुरी दिली आहे ते QR कोड असणारे नवीन PAN कार्ड आहे. या बदलाचा उद्देश हा PAN अलॉटमेंटची प्रक्रिया अधिक सुविधापूर्ण आणि सुरक्षापूर्ण करणे तसेच PAN धारकासंबंधित माहितीची सुरक्षितता वाढविणे, डुप्लिकेट पॅन कार्ड घटना कमी करणे हा आहे. (एका पेक्षा अधिक पॅन असणे कायद्याच्या विरोधात आहे. अशा केसमध्ये कलम २७२B अंतर्गत ₹ १०,००० पर्यंत दंड होऊ शकतो.)

या संदर्भातील काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेवुयात.

१. आपला असलेला PAN क्रमांक तसाच राहणार आहे. तुमच्याकडे जुने पॅन कार्ड असल्यास, तुम्ही नवीन QR कोड-सक्षम कार्डवर अपग्रेड करणे हा पर्याय निवडला नाही तर तुम्ही तेच जुने कार्ड वापरणे सुरू ठेवू शकता.
२. तुमच्या नवीन कार्डवर एक QR कोड दिला जाईल ज्यात तुमची सर्व माहिती स्थापित असेल. याचा वापर करून कर भरणे किंवा कंपनीची नोंदणी करणे किंवा बँकेत खाते उघडणे सोपे होणार आहे.
३. नवीन PAN कार्डमध्ये सुरक्षा वैशिष्ट्ये देखील स्थापित केली जातील, जेणेकरून फसवणुकीसारख्या घटनांवर मात करता येईल.
४. PAN कार्डशी संबंधित सर्व सेवांसाठी एक एकत्रित प्लॅटफॉर्म तयार केला जाईल, ज्यामुळे पॅन धारकांना PAN माहितीत बदल किंवा तत्सम सेवा या संदर्भात अधिक चान्गल्या सेवेचा अनुभव येईल.
५. तूम्ही हे नवीन पॅन कार्ड तुमच्या ईमेल आयडीवर विनामूल्य मिळवू शकता. यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही . मात्र फिजिकल (प्रत्यक्ष) पॅन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदाराला ५० रुपये निर्धारित शुल्क भरावे लागणार आहे .

पॅन 2.0 साठी अर्ज कसा कराल ?

पॅन 2.0 साठी अर्ज करण्यापूर्वी तुमचे पॅन NSDL आणि UTI Infrastructure Technology and Services Ltd. (UTIITSL) यापैकी कोणत्या संस्थेने जारी केलेले आहे, याची माहिती मिळवा. ही माहिती तुमच्या पॅन कार्डच्या मागे देण्यात आलेली असते.

NSDL च्या माध्यमातून ई-पॅन (सॉफ्टकॉपी) साठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचा अवलंब करता येईल.
१. सर्वप्रथम NSDL ई-पॅन पोर्टल – https://www.onlineservices.nsdl.com/paam/requestAndDownloadEPAN.html ओपन करा.
२. यथील पेजवर तुमच्या पॅन सह, आधार नम्बर (व्यक्तिगत पॅनसाठी) आणि जन्मतारीख एंटर करायाची आहे.
३. दिलेली माहिती भरताच वन टाइम पासवर्ड (OTP ) मिळवण्याच्या ऑप्शनवर (ईमेलवर की मोबाईलवर ) क्लिक करा.
४. आलेला OTP टाकून अर्ज सबमिट करा.
५. ई-पॅन (सॉफ्टकॉपी PAN ) तीन वेळा तुमच्या नोंदणीकृत ईमेल आयडीवर विनामूल्य वितरित केले जाऊ शकते. यानंतर मात्र यासाठी तुम्हाला GST सह ८. २६ रुपये इतका चार्ज लागेल. पेमेंट पूर्ण झाल्यावर ३० मिनिटांत तुमच्या रजिस्टर्ड ई-मेल आयडी वर ई-पॅन डिलिवर होईल.

UTIITSL च्या माध्यमातून ई-पॅन (सॉफ्टकॉपी) साठी अर्ज करण्यासाठी खालील स्टेप्सचा अवलंब करता येईल.

१. सर्वप्रथम https://www.pan.utiitsl.com/PAN_ONLINE/ePANCard ओपन करा.
२. आलेल्या पेजवर सर्व तपशील – जसे पॅन, जन्मतारीख आणि कॅप्चा कोड एंटर करा आणि अर्ज सबमिट करा.
३. तपशील सबमिट केल्यावर, वेबसाइटवर ईमेल आयडी नोंदणीकृत आहे का ते दर्शवेल. जर कोणताही ईमेल आयडी नोंदणीकृत नसेल, तर तो सुरू झाल्यानंतर करदात्यांना त्यांचा ईमेल आयडी पॅन 2.0 अंतर्गत विनामूल्य अपडेट करता येईल.

या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मध्ये काही अडचण आल्यास तुम्ही tininfo@proteantech.in वर ईमेल किंवा ०२०-२७२१८०८० वर कॉल करू शकता.

PAN 2.0 उपक्रम भारताच्या कर प्रशासन प्रणालीमध्ये डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. प्रगत तंत्रज्ञान, इको-फ्रेंडली प्रक्रिया आणि PAN/TAN सेवांसाठी एक एकीकृत प्लॅटफॉर्म देणारे PAN 2.0 डिजिटल इंडिया मिशनच्या व्यापक उद्दिष्टांशी सांगड घालणारे आहे.

टीम SWS


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/