श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके
साधारण १९९० च्या दशकानंतर भारतामध्ये इंटरनेटचा प्रवेश झाला आणि जगाभरात या माध्यामातून सुरु झालेल्या क्रांतीचे लोण आपल्या देशातही पसरले ! उत्तरोत्तर 2G, 3G, 4G नेटवर्क उपलब्ध झाले आणि इंटरनेट प्रचंड वेगाने घराघरात पोहोचले. उपयुक्तता, उपलब्धता आणि सुविधा हे सारे वारकर्त्यांनी ताडले इंटरनेट हे माध्यम सर्वव्यापी झाले. जेव्हा २०१५ साल उजाडले तेव्हा E -Commerce ने इंटरनेटच्या आधारे जोर धरला आणि बघता बघता आर्थिक व्यवहार इंटरनेटच्या साह्याने होवू लागले.ही सर्व व्यवस्था शोधून तयार करणारे जसे तज्ञ होते तसेच या व्यवस्थेतील पळवाटा शोधून त्याचा फायदा घेणारे हॅकर्सही होते आणि आहेत. म्हणूनच डेटा वापराचे कितीही सुरक्षा माध्यमे, सॉफ्टवेअर्स असली तरीही आजही कधी सर्व्हर हॅक होतात, तर कधी बॅन्क अकाउंट मधून पैसे गायब होतात. आताच २०२४ मधे आपण ट्विटर वरून डेटा लीक झाल्याचे ऐकले. मायक्रोसॉफ्ट डेटा लीक, सीस्को सायबर अटॅक, भारतातील AIIMS ह्या नामांकित मेडिकल इन्स्टिटय़ूट वरील अटॅक, आधार डेटा लीक असे अनेक हॅकिंगचे किस्से आपण ऐकले आहेत. डेटा हॅकींगमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई होवू शकत नाही. त्यातही फायनान्शियल आणि व्यक्तीगत डेटा याची सुरक्षा राखणे हा ज्वलंत प्रश्न सगळ्या जगभरात आज उभा आहे.
ह्यावर उपाय म्हणून ब्लाॅकचेन (BLOCK CHAIN) ही संकल्पना तज्ञांनी विकसीत केली. आज ब्लाॅकचेन टेक्नॉलॉजी चा उपयोग अनेक देशात आणि अनेक क्षेत्रात होतो आहे.तर ही ब्लाॅकचेन टेक्नॉलॉजी काय आहे आणि तिचा उपयोग भविष्यात FINTERNET ह्या क्षेत्रात उत्तम प्रकारे कसा होवू शकतो हे आपण बघूयात.

तज्ञ्यांच्या मते ब्लाॅकचेन ही संकल्पना आज ह्या घडीला अत्यंत सुरक्षित आहे. ह्या संकल्पनेत डेटा एकत्रित नसून तो वेगवेगळ्या तुकड्यात (ब्लाॅक्स) मधे ठेवला जातो. समजा एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवायचे असतील तर तो आधी त्याच्या प्रायव्हेट डिजिटल की द्वारे आपल्या व्यवहाराची सुरवात करेल. मग हे ट्रॅनसॅक्शन, नेटवर्क मधील नोड (NODE) शी जोडले जाईल. जेव्हा हा डेटा कोणत्याही नोडशी जोडला जातो तेव्हा नोड , हा डेटा पाठविणारा Authorised Sender आहे की नाही हे तपासून बघतो . ज्याला पैसे पाठवायचे आहे तो देखील Authorised Receiver आहे की नाही हेही तपासले जाते. आता पैसे पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव, रक्कम, कोणाला पाठवायचे हे सारी माहिती वेगवेगळ्या ब्लॉक्स मधे Encrypt करून ठेवली जाते. आणि हे ब्लाॅक्स युनिक नंबरींग सिस्टीमने जोडले जातात. हा डेटा वेगवेगळ्या ब्लाॅक्स मधे स्टोअर केल्याने त्याच्यात हेराफेरी करणे शक्य होत नाही. असा हा डेटा रिसीव्हींग स्टेशनला पोहोचताच तो पुन्हा ब्लाॅक्स मधून काढून Decrypt केल्या जातो आणि मगच आणि पैसै दुसऱ्या व्यक्तीला मिळतात. अश्याप्रकारे ब्लाॅकचेन टेकनोलाॅजी वापरून पाठवलेला डेटा सुरक्षित रहातो. कारण ह्या प्रकारात डेटाची हेराफेरी करणे अत्यंत कठीण आहे. कोणत्या ब्लाॅक मधे, किती ब्लाॅक मधे डेटा आहे हे कळणे आणि तो प्रत्त्येक ब्लाॅक मधे बदलणे ही प्रक्रिया अवघड आहे. ह्या व्यवहारात महत्वाची बाब अशी आहे की ह्यात सेंडर आणि रिसीव्हर येवढेच राहातात. मधले मध्यस्थ जसे बॅंका किंवा इतर फॅनॅन्सियल कंपनी यात येऊ शकत नाही. त्यामूळे हे व्यवहार कमी पैशात होतात. ह्या आर्थिक व्यवहारात आज BITCOIN ही करन्सी मोठया वापरली जाते.
ही BLOCK CHAIN पद्धती फक्त आर्थिक व्यवहार करण्यापुरते मर्यादित नसून इतर बरेच व्यवहार ही टेक्नोलाॅजी वापरून करता येतात. जसे की एखादा काॅनट्रॅक्ट सुरक्षितपणे पाठवायचा आहे किंवा मतदान प्रक्रिया राबवायची आहे, व्यक्तिगत डेटाची देवाणघेवाण करायची आहे, फोरेन्सिक डेटा, मिलिट्री डेटा ह्यावर काम करायचे आहे असे अत्यंत गोपनीय व्यवहार ब्लाॅकचेन पद्धतीने करता येतात. आज देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यवहारांचे प्रमाण खूप पटीने वाढले आहे. आर्थिक व्यवहार जसे की पैशाची देवाण घेवाण, घर, जमीन-जुमला, सोने, शेअर्स खरेदी-विक्री हे आता जागतिक स्तरावर केले जातात. बऱ्याच मोठ्या आसामी अश्या आहेत की त्यांचे वेगवेगळ्या देशात स्थावर मालमत्ता आहे. त्यात मोठ्या रकमेची उलाढाल होते आणि इथेच गरज पडते ती सुरक्षित आणि गोपनीय व्यवहाराची आणि सोयीची. त्याकरता डिजिटल युगात FINTERNET हा शब्द प्रचलित होतो आहे.
FINTERNET हया शब्दाध्ये दोन शब्दाचे मिश्रण दिसते, ते म्हणजे फायनान्स आणि इंटरनेट ! ह्या प्रणालीचे महत्वाचे चार अंग आहेत: टोकनायझेन, क्रीप्टोग्राफी, रेग्युलेटरी फ्रेमवर्क, युनिव्हर्सल डिजीटल प्लॅटफॉर्म !

हे सारे कसे काम करतात हे जाणून घेवूया. समजा एखाद्या व्यक्ती जवळ प्लाॅट आहेत, घर आहे, शेती आहे, गाड्या आहेत आणि तेही दोन तीन देशात विखुरलेले आहे. त्याचा व्यवहार करायचा म्हणजे पेपर वर्क, मधले कमीशन घेणारे,प्रत्येक देशाचे नियम ह्यात खूप वेळ जातो आणि मिळणाऱ्या पैशात बरेच वाटेकरी असतात. नविन फिंटरनेट संकल्पना ह्या खरेदी विक्री मधे खालील प्रमाणे काम करते.
सर्वप्रथम पैशाच्या मोबदल्यात विकले जाणाऱ्या सार्या घटकांना एकेक युनीक टोकन नंबर दिले जाते. त्या टोकनचा बाजार भाव, त्याचा वर्ग, त्याचे ठिकाण, त्याचे वर्णन सारे ह्या टोकन मधे रूंपातरीत होते. हे काम टोकन सर्विस प्रोव्हायडर करतात. टोकन सर्विस प्रोव्हायडर ह्याचा शहानिशा करून सारा डेटा एनक्रीप्ट करून त्याला एक युनिक नंबर देतात. मग हे टोकन ज्याला विकायचे तो हे टोकन इंटरनेटवर विकण्यास ठेवतो. ज्या व्यक्तीला हे टोकन घ्यायचे आहे तो सर्विस प्रोव्हायडर कडून टोकन बद्दल माहिती घेतो. ह्या इंटरनेटवर चाललेल्या व्यवहारात कुठेही डेटाचे डिटेल्स लीक होत नाही कारण इथे उपयोगी येते ती ब्लाॅकचेन टेक्नॉलॉजी. सरते शेवटी घेणाऱ्याला सारे हक्क व कागदपत्र इलेक्ट्रॉनिक फॉर्ममधे मिळतात आणि विकणाऱ्याला त्याचे पैसे युनिवर्सल करन्सी मधे ! ह्यातील फायदे म्हणजे ह्या व्यवहारांना स्थळ, काळ आणि वेळेचे बंधन असत नाही आणि दोन जणांमधील व्यवहार अत्यंत गोपनीय पद्धतीने हाताळला जातो.
आज देशांतर्गत आणि देशाबाहेर फक्त करन्सी स्वरूपातील व्यवहार होतात आहे. पुढे जावून Finternet मुळे कोणत्याही वस्तूची (ज्याला आर्थिक मुल्य आहे) खरेदी विक्री ह्या तंत्रज्ञानाने होवू शकते. सद्य स्थितीत FINTERNET बाल्यावस्थेत आहे. तज्ञ लोक युनिवर्सल रेग्युलेटरी फ्रेमवर्क आणि युनिवर्सल डिजीटल प्लॅटफॉर्म वर काम करतात आहे. FINTERNET वरील प्रगती आपण नंतरच्या लेखात बघुयात.
श्री. दिपक दोडके, डाॅ.सौ.मृणालिनी दोडके
(अभ्यासक- अभियांत्रिकी आणि माहिती तंत्रज्ञान)
