अवास्तव परताव्याची हमी देणाऱ्या माध्यमांपासून सावधान !
ग्राहकहो नमस्कार ! फसवणूक झालेल्या ऑनलाईन ट्रेडिंगच्या / गुंतवणुकीच्या अनेक घटना समोर येत आहेत म्हणून ग्राहकहित लक्षात घेता हा संवाद !!

SEBI कडे, अनेक फसव्या Treding च्या घटनांबद्दल गुंतवणूकदार/मध्यस्थांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत. गुंतवणुकदारांना आमिष दाखवण्यासाठी, उच्च परताव्याची हमी देणाऱ्या अँप्सबद्दल अथवा डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) बद्दल जाहिराती आपणही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स ,टेलिव्हिजनवर पहात आहोत. काही गुंतवणुकदार अशा तोतया ॲपना/माध्यमांना भुलून आकर्षक परतावा मिळविण्यासाठी ॲप डाउनलोड करतात आणि ऑनलाईन गुंतवणूक/ ट्रेडिंग करतात. त्यांना विश्वास वाटत असतो की आपण कायदेशीर आणि नोंदणीकृत मध्यस्थांशी व्यवहार करत आहोत. तथापि, ही गुंतवणूक स्टॉक एक्सचेंज/डिपॉझिटरीमध्ये प्रत्यक्षात कधीच होत नाही. जेव्हा गुंतवणूकदार आपली गुंतवणूक काढून घेण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते ॲप अचानकपणे अकार्यक्षम होते, अशा घटना घडत आहेत. तेव्हा अवास्तव परताव्याचे आश्वासन देणाऱ्या फसव्या गुंतवणूक योजना/ॲप्सपासून गुंतणावूनदारांनी सावध रहाणे गरजेचे आहे.
बाजारातील सहभागासाठी विश्वासार्ह वातावरण निर्माण करणे, भारतीय सिक्युरिटीज मार्केटमध्ये आत्मविश्वास वाढवणे. ही Central Depository Services Limited (CDSL) या संस्थेची उद्दिष्ट्ये आहेत. त्याकरिता,प्रगत तंत्रज्ञानाचा आधार घेऊन CDSL, डिमॅट खात्यांमध्ये असलेल्या सिक्युरिटीजची सुरक्षितता सुनिश्चित करत असते तसेच भांडवली बाजारातील सर्व सहभागींना सेवा प्रदान करते ( जसे एक्सचेंजेस, क्लिअरिंग कॉर्पोरेशन, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP) आणि गुंतवणूकदार). आणि म्हणून कुठल्याही अँप, डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP) ची अधिकृतता तपासण्यासाठी , CDSL च्या नोंदणीकृत डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (DP ) ची माहिती खालील लिंकवर जरूर तपासावी ! लिंक आहे: https://www.cdslindia.com/DP/dplist.aspx
सर्व गुंतवणूकदारांनी याची नोंद घ्यावी आणि गुंतवणुकीपूर्वी माहितीची पडताळणी जरूर करावी ! अशा घटना दुर्दैवाने आपल्या कोणाच्या बाबतीत घडल्याच तर आपल्याला तक्रार कुठे करावी , निवारण पद्धती काय असते हे माहित असणे आवश्यक आहे. आम्ही SWS मध्ये याची काळजी घेतलेली आहे. SWS चे मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री. रघुवीर अधिकारी यांनी NISM द्वारे घेतला जाणारा, “Online Dispute Resolution (ODR) Mechanism ” हा कोर्स पूर्ण केलेला आहे ! या स्मार्ट ओ. डी. आर. पोर्टलची लिंक https://smartodr.in/ अशी आहे जिथे गुंतवणूकदार ऑनलाइन निवारणासाठी त्यांची तक्रार नोंदवू शकतात !!
तेव्हा ग्राहकहो, गुंतवणूक सावधपणे करा आणि आपले आर्थिक नुकसान टाळा !!
– टीम SWS
contact@swsfspl.com

