Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


Psychology of Investors: Anchoring Bias

फुकट ते पौष्टिक  ?

आज घरात फक्त बापलेकाची जोडगोळी आहे ! आज IPL मध्ये चैन्नईची मॅच असल्याने चिरंजीव माहौल तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत !

चिरंजीव: बाबा, आज Wonderful Wednesday आहे ! म्हणजे पिझा वर BOGO ऑफर !!  सेम प्राईझ मध्ये दोन पिझा !! शिवाय  IPL मध्ये चैन्नईची मॅच, और क्या चाहिये ? BOGOs Make Wednesdays  Cool !!    

मी: BOGO ? ते काय असते ?

चिरंजीव: (कुठल्या बाबा आदम काळात राहतात हे, अशा अविर्भावात) :   हे (सुद्धा) माहित नाही ?  अहो BOGO म्हणजे Buy One Get One  फ्री  !!

मी: अच्छा !! म्हणजे आमच्या भाषेत “फुकट ते पौष्टिक !!”  तू सुद्धा BOGO च्या Algo चा शिकार झालास तर !! देवा , उघड रे यांचे डोळे !! बेटा, BOGO is actually Anchoring Bias  !! तुमचे मत परिवर्तन करायला भाग पाडणारी मानसिकता !!

चिरंजीव: (वैतागत ) तुम्ही ज्येष्ठ मंडळी आम्हा तरुणाईला अगदीच “हे” समजू नका हं बाबा !! अहो परवडते ते !!

मी: असेल परवडत ! पण म्हणजे  सेम प्राईझ मध्ये दोन पिझा नक्कीच  नाही !! अशाने दिवाळे नाही का निघणार पिझा कंपनीचे ! Wonderful Wednesday ला पिझा ची किंमत बदलते आणि थोड्याशा डिस्काउंटींगला तुम्ही लोक BOGO समजतात !! अरे सर्वच फुकट पौष्टिक  नसते ! 

चिरंजीव: (‘तुम्ही लोक’ शब्दावर नाराज होत ): अहो पण जरा दोन पॆसे जास्त देऊन दोन पिझा मिळतात त्याचे काय ?

मी: आता बरोबर बोललात BOGO च्या Algo चे  शिकार !!  ग्राहकांनी असे काहीतरी  एक्सट्रा मिळवण्याच्या नादात जास्त पैसे देऊन जास्त  शॉपिंग करावी, हाच तर आहे BOGO चा Algorithm !! त्या एक्सट्राच्या लोभापायी अनावश्यक Buying करत आहात तुम्ही लोक  ! तुमच्या सारख्या डाकू हसिनांना जाळ्यात फसविण्यासाठीच असतो  हा BOGO प्लॅन!

चिरंजीव: (उत्सुकतेने)  : डाकू हसिना ? ते काय आहे ?

निव्वळमी:   (कुठल्या बाबा आदम काळात राहतात हे, अशा विजयी अविर्भावात ): हे (सुद्धा) माहित नाही ?  अरे, जुन २०२३ रोजी लुधियाना मध्ये ८.५ कोटीच्या रोख रकमेची चोरी झाली. पंजाब पोलीसांच्या तपासामध्ये मनदिप कौर उर्फ डाकु हसीना आणि तिचा पती जसवींदरसिंग हे या चोरीचे मुख्य सुत्रधार आहेत असे समजले ! ते दोघे नेपाळला पळून जाणार आहेत अशी खबर पोलिसांना मिळाली.  शिवाय ही टीपही  मिळाली की डाकू हसीना नेपाळला पलायन करताना  धार्मिक स्थळांना भेटी देणार आहे. या प्रवासात ते हेमकुंडसाहिब येथे दर्शनासाठी थांबणार आहेत अशी खबर पोलिसांना मिळताच त्यांनी रेकी केली आणि त्यांच्या लक्षात आले की अशा भक्तांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी या दोघांना पकडणे खुपच अवघड आहे . पंजाब पोलीसांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली – फ्री फ्रुटीचे वाटप करण्याची! कोणालाही हास्यास्पद वाटावी अशी ही कल्पना . पण ही कल्पना चक्क यशस्वी झाली. हे जोडपे फ्री फ्रुटी वाटपाच्या स्टॅालवर आले तेव्हा त्यांचे चेहरे झाकलेले होते. फ्रुटी पिण्यासाठी त्यांनी मास्क बाजुला केला, त्यावेळेस साध्या गणवेशातील पोलीसांनी त्यांना ओळखले. कोणतीही घाई न करता पोलीसांनी त्यांना दर्शन करु दिले आणि बाहेर पडल्यानंतर पाठलाग करुन त्यांना पकडले !! बघ, निव्वळ १० रु. चे फ्री फ्रुटी पिण्यासाठी  ८.५ कोटीच्या रोख रकमेची मालकीण डाकू हसीना कशी भुलली आणि फसली !! अशी काम करते ही “फ्री” देण्या-घेण्याची ची मानसिकता !!

चिरंजीव: बापरे ! Free ची मानसिकता Care Free करते हे खरेच !!

मी: अरे, थोडेसेच पैसे जास्त मोजून काहीतरी एक्सट्रा मिळतेय ही भावना ग्राहकांची  मानसिकता सुखाविते आणि त्यांना अनावश्यक खरेदी करण्यासाठी ट्रीगर करते ! ग्राहक आपल्याला ही खरेदी मस्त परवडतेय  अशा खोट्या सुखासाठी कंपन्यांचे सेल्स वाढवत राहतात ! आपले सेल्स टार्गेट पूर्ण करण्यासाठी कंपन्या BOGO Algorithm अनेक पद्धतींनी इम्पलिमेन्ट करतात. जसे तुझ्या Wonderful Wednesday  सारखी Limited Time Offer, Special Day Offer, Countdown Timers, Zero Interest EMIs, Offer  Valid For First X Early Birds इ. अशा ऑफर्स,  ग्राहकांमध्ये  तातडीच्या  खरेदीची भावना निर्माण करतात !  त्यांना वाटते की ऑफरची मुदत संपण्यापूर्वी किंवा स्टॉक संपण्यापूर्वी जलद कृती करू आणि वस्तू पदरात पाडू ! ग्राहकाला चांगली संधी गमावण्याच्या  भीतीचे दडपण  वाटू लागते आणि फायदा मिळवण्यापेक्षा तोटा टाळण्याला ग्राहक प्राधान्य देवू लागतो ! अशा ऑफरमध्ये ग्राहकांच्या वर्तनाला चालना देणारा एक मानसशास्त्रीय घटक असतो  तो म्हणजे रेसिप्रोकेट करायला भाग पडण्याचा ! BOGO विक्रेत्याकडून अशी औदार्याची भावना (दिखावा) दिसताच  ग्राहकांमध्ये कृतज्ञता आणि परस्पर कर्तव्याची भावना जागृत होऊ शकते आणि हे इतके करत आहेत आपल्यासाठी तर आपणही रेसिप्रोकेट नको का करायला असे त्यांना वाटायला लागते. यामुळे गरज नसताना किंवा नको असतानाही ती वस्तू खरेदी करण्याचा  मोह  होतो !! अजून एक उदाहरण घे ‘Zero Interest EMI’ ऑफर मध्ये मिळणारी कर्जे ! कर्जासाठी शून्य-किंमत EMI हा एक आकर्षक पर्याय वाटतो कारण तो वरवर पाहता तुम्हाला व्याजांची बचत करण्यात मदत करतो. तथापि, वास्तविकता दिसते तशी नसते कारण या क्रेडिट सुविधा अनेकदा छुप्या शुल्कासह येतात. बच्चू , “ये मोह मोह के धागे, तेरी दिमागमे यु उलझे ” की केलीच शॉपिंग समज !! तेव्हा लक्षात ठेवा चिरंजीव, कुठलीही गोष्ट फ्री नसते ! त्यामागे तुम्ही कळत-नकळत किंमत मोजतच असता !!

चिरंजीव: (वा, बरीच  माहीती आहे की यांना अशा अविर्भावात):  बरे !! धन्यवाद  पंजाब पोलीस बाबा ! या डाकू हसीनाला वेळीच सावध केल्याबद्दल !! 

मी: (आमची अनुभवी पिढीही अगदीच “हे” नाही अशा थाटात)

बचना ऐ हसीनों, लो BOGO आ गया ,

Sales  का आशिक़, सोच  का दुश्मन, 

BOGO की  अदा है , यारों सबसे जुदा !! 

 आणि मग बापलेक या गाण्यावर मस्त नृत्याचा ताल धरतात !!

संकल्पना : श्री. रघुवीर अधिकारी, CEO, SWS
शब्दांकन: डॉ. रुपाली कुलकर्णी, Training Head, SWS (९०११८९६६८१)


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/