Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


आर्थिक नियोजन: Financial Planning

बोली भाषेतअर्थम्हणजे पैसा. असं म्हणतात कीअर्थअसेल तर जीवनाला अर्थ आहे. पैशाचं जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात उदरनिर्वाहासाठी प्रत्येकजण काहींना काही उद्योग करत असतो. सर्वसाधारणपणे काही पैसे आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी वापरावा लागतो तर उरलेला पैसा हा गुंतवणुकीसाठी ठेवला जातो. आपल्याकडे बऱ्याचदा पैसे कमावण्यासाठी जेवढे महत्व दिले जाते तेवढे त्याचे व्यवस्थापन/नियोजन (Financial Planning) करण्यास दिले जात नाही. त्याकडे आपण कानाडोळा करतो. नेहमीच डोळसपणे केलेली गुंतवणूक हि किफायतशीर ठरते. अनेकांना याची, म्हणजे “अर्थ नियोजनाची” (Financial Planning) जाणीवसुद्धा नसते. बँके मधील मुदतठेवी, पोष्टातल्या योजना किंवा विमा गुंतवणूक यापलीकडे बऱ्याच लोकांना काहीही माहित नसते. याचे मुख्य कारण म्हणजे अर्थसाक्षरतेचा (Financial Literacy) अभाव असणे होय. आज आर्थिक नियोजना विषयी (Financial Planning) अधिक जाणून घेऊयात.  


उपलब्ध साधन संपत्तीचे, आयुष्यातील प्रत्येक गरजेकरता / उद्दिष्टयां करिता , विवेकाने सुनियोजन करून संपत्तीमध्ये वाढ करणे (आर्थिक उद्दिष्ट साध्य करणे) म्हणजे अर्थनियोजन होय.


आर्थिक नियोजनातील महत्वाचे घटक खालील प्रमाणे असतात :


  १. सध्याचे वय – Today’s Age

  २. आयुष्यात तुमच्या आर्थिक अपेक्षा काय आहेत याबाबत स्पष्टता – Financial Goals

  ३. सद्य आर्थिक स्थिती – Current Financial Position

  ४. नियोजनाचा कालावधी – Term of Financial Planning

  ५. काटेकोरपणे अंमलबजावणी – Implementation 

  ६. मूल्यमापन – Monitoring and Evaluation

  ७. भावनिक निर्णयांना येथे थारा नाही – No Emotional Decision

  ८. अर्थसल्लागाराची मदत – Help of Financial Planner

हे घटक विस्तृतपणे समजाऊन घेऊ.

1) सध्याचे वय (Current Age) – सध्याचे वय म्हणजे नियोजनाच्या वेळी असलेले वय. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे . प्रत्येक वयासाठी आर्थिक नियोजन हे वेगळे असते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, आर्थिक नियोजनाचा सूर बदलतो.


2) आर्थिक उद्दीष्ट (Financial Goal) – वयानुसार प्रत्येकाचे आर्थिक उद्दिष्ट बदलते (काही-प्रमाणात बदलते). लघु मुदतीचे आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट यांची पूर्ण यादी करा. आर्थिक उद्दिष्ट ठरवताना हे लक्षात असुद्या.


१. आर्थिक उद्दिष्ट ठरवताना त्यामध्ये वास्तविकता आणि स्पष्टता असावी.

२. उद्दिष्ट जितके वास्तविक तितके गाठणे सोपे असते.

३. उद्दिष्ठ ठरवताना किमान आपण स्वतःशी तरी प्रामाणिक असणे गरजेचे आहे.


उदा. मला श्रीमंत व्हायचंय म्हणजे नेमकं काय. कारण प्रत्येकाची श्रीमंत असण्याची व्याख्या वेगळी असू शकते. कुणाला 1 लाख म्हणजे श्रीमंत वाटेल तर कुणाला 1 कोटी. मुद्दा असा कि, उद्दिष्ट स्पष्ट असावे.


3) सद्य परिस्थीचा आढावा (Current Financial Position ) – याचा अर्थ सध्या आर्थिक स्थिती काय आहे याचा बारकाईने आणि सूक्ष्म रीतीने अभ्यास करणे. यात प्रामाणिकता असणे खूप गरजेचे आहे. कारण हाच आपला अर्थनियोजनाचा पाया आहे. उद्दिष्ट कसे गाठायचे आहे, हे यावरून स्पष्ट करता येते.


4) नियोजनाचा कालावधी (Term of Financial Planning) – आपण कोणते उद्दिष्ट गाठण्यासाठी किती वेळ देणार आहोत याची रीतसर मांडणी.


5) काटेकोरपणे अमलबजावणी (Implementation)- केलेल्या नियोजनाची काटेकोरपणे अमलबजावणी केलीं पाहिजे. धरसोड वृत्ती येथे चालत नाही. कोणतेही नियोजन काटेकोरपणाशिवाय तडीस जाऊ शकत नाही.


6) मूल्यमापन (Monitoring and Evaluation): ठरवलेल्या उद्दिष्टाचे वेळोवेळी मूल्यमापन करावे. स्थळ, काळ, वेळ आणि नियम यानुसार यात बदल होत जातात. त्याचे अवलोकन करावे. गरज पडल्यास नियोजनात योग्य तो बदल करावा. आपले उद्दिष्ट साध्य होत आहे ना, त्याकडे लक्ष असू द्यावे.


7) भावनिक निर्णयांना येथे थारा नाही (Emotional Decision without thinking of its affect)- आर्थिक नियोजन करताना कोणताही भावनिक निर्णय घेऊ नये. हा नियोजन विस्कळीत करणारा महत्वाचा घटक आहे. आपत्कालीन गरजांसाठी वेगळी तरतूद असावी.


8) अर्थसल्लागाराची मदत (Help of Finance Planner) – परिपूर्ण अर्थ नियोजनासाठी सातत्याने, यानिगडीत तांत्रिक बाबींचा अभ्यास असणे गरजेचे आहे. सर्वानाच हे काही शक्य होत नाही. त्यासाठी अर्थ सल्लागार Financial Planners/Consultants उपलब्ध असतात.


आता आर्थिक नियोजनातील संभाव्य चुका ही पाहूयात

आर्थिक नियोजनातील चुका:


१.  उद्दिष्ट स्पष्ट नसणे किवा त्यात वास्तविकता नसणे.

२.  परीणामाची गांभीर्यता लक्षात न घेता भावनिक निर्णय घेणे.

 ३. आर्थिक नियोजना चे वेळोवेळी मूल्यमापन न करणे

  ४. आर्थिक नियोजन हे फक्त निवृत्तीसाठी आहे हा गैरसमज असणे.

  ५. आर्थिक नियोजन हे फक्त श्रीमंत लोकांनीच करावे हा गैरसमज असणे.

  ६. कमी रकमेसाठी अर्थनियोजन उपयोगाचे नसते किंवा आपल्याकडे पुरेसे पैसे आले कि बघू अशी मानसिकता असणे).

  ७. पैश्यातील काही रक्कमेची बचत केली म्हणजे गुंतवणूक केली,हा गैरसमज असणे.

  ८. अवास्तव मिळकतीची अपेक्षा करणे.

  ९. आर्थिक नियोजनासाठी योग्य वेळेची वाट बघणे ,त्यात उशीर /चालढकल करणे.

१०. आर्थिक नियोजनासाठी योग्य सल्लागाराची मदत न घेणे.
आर्थिक नियोजनातील महत्वाच्या घटकांचा योग्य, वास्तविक विचार करून आणि संभाव्य चूका टाळून  केलेले नियोजन नक्कीच लाभदायी, मानसिक समाधान देणारे ठरते. आणि असे नियोजन S.E.B.I. रजिस्टर अर्थसल्लागाराची मदत घेउन करणेच श्रेयस्कर !!


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/