(Rational Financial Decision & Wealth Creation)
जागतिक पातळीवर घडणाऱ्या घटना — युद्धसदृश परिस्थिती, व्याजदरांमधील बदल, चलनवाढ, आंतरराष्ट्रीय आर्थिक धोरणे किंवा एखादे अनपेक्षित संकट — या सर्वांचा परिणाम शेअर बाजारावर होतो. अशा वेळी बाजारात चढउतार वाढतात, पोर्टफोलिओचे मूल्य तात्पुरते कमी होते आणि गुंतवणूकदारांच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. ही अस्वस्थता अनेकदा घाईघाईच्या आणि चुकीच्या आर्थिक निर्णयांकडे नेते.
Behavioral Finance किंवा वर्तनाधिष्ठित वित्तशास्त्र सांगते की गुंतवणूकदार नेहमी तर्कशुद्ध निर्णय घेत नाही. भीती, अनिश्चितता आणि तोटा टाळण्याची तीव्र इच्छा (Loss Aversion) यामुळे “आता सर्व काही विकून टाकावे” अशी प्रतिक्रिया उमटते. प्रत्यक्षात, हा तोटा बहुतांश वेळा कागदी आणि तात्पुरता असतो.

दररोजच्या बातम्या, सोशल मीडियावरील अंदाज, तज्ज्ञांचे परस्परविरोधी मत — हा सगळा अल्पकालीन बाजारातील गोंधळ आहे. मात्र गुंतवणुकीचे खरे यश ठरते ते दीर्घकालीन परिणामांवर. इतिहासाकडे पाहिले तर हे स्पष्ट होते की जगाने अनेक आर्थिक संकटे अनुभवली असूनही, दीर्घकाळ संयम राखून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना बाजाराने योग्य मोबदला दिला आहे.
समग्र आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर भारताची मायक्रो इकॉनॉमिक पायाभरणी मजबूत आहे. सातत्याने वाढणारा GDP, संरचनात्मक सुधारणा, देशांतर्गत वापरातील वाढ, कंपन्यांची सुधारलेली आर्थिक स्थिती आणि सरकारकडून चालू असलेली भांडवली गुंतवणूक — हे घटक भारताच्या दीर्घकालीन आर्थिक क्षमतेला आधार देतात.
हे मान्य करावे लागेल की सध्या बाजार काही प्रमाणात महाग वाटू शकतो. मात्र नेमके कधी करेक्शन येईल हे अचूकपणे सांगणे अत्यंत कठीण आहे. अशा अंदाजांच्या मागे धावणे म्हणजे Market Timing करण्याचा प्रयत्न — आणि इतिहास सांगतो की या प्रयत्नात अनेक गुंतवणूकदार चांगल्या संधी गमावतात. अशा अनिश्चित काळात Asset Allocation चे महत्त्व अधिक वाढते. इक्विटी, डेट, सोने किंवा इतर गुंतवणूक साधनांमध्ये योग्य प्रमाणात विभागणी असलेला पोर्टफोलिओ चढउतारांचा परिणाम कमी करतो.

सामान्य मार्गदर्शक तत्त्व असे सांगते की पुढील तीन वर्षांत ज्या पैशांची गरज नाही, ती गुंतवणूक बाजारात कायम ठेवणे योग्य ठरते. निवृत्ती नियोजन, मुलांचे शिक्षण, दीर्घकालीन संपत्ती निर्मिती यांसारखी उद्दिष्टे बाजारातील चढउतार सहन करूनच साध्य होतात.जागतिक बातम्यांमुळे म्युच्युअल फंड विकणे हा बहुतेक वेळा भावनिक निर्णय असतो. त्याऐवजी Asset Allocation चे पुनरावलोकन, गरज असल्यास Rebalancing आणि गुंतवणूक कालावधी तपासणे अधिक योग्य ठरते.
बाजारातील अस्थिरता ही गुंतवणुकीचा अविभाज्य भाग आहे. शिस्त, संयम आणि योग्य Asset Allocation यांवर आधारित गुंतवणूकच दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेकडे नेते.
SWS टीम तुमचा पोर्टफोलिओ सखोलपणे तपासून, सध्याच्या अस्थिरतेतही आणि भविष्यातील वाढीसाठीही तो योग्य दिशेने राहील याची खात्री करून देते.
तुमच्या पोर्टफोलिओच्या पुनरावलोकनासाठी SWS टीमशी संपर्क साधा.
टीम SWS
संपर्क : श्री. विक्रांत राठोड
75078 84477

