
पगारदार यक्तींना कर वाचविण्यासाठी (Income Tax Saving) अनेक पर्याय उपलब्ध आहेत. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास कर बचतीसह गुंतवणुकीवरील परतावाही मिळवता येतो . तुम्ही जर कर बचतीसाठी पर्याय शोधत असाल तर या पुढील पर्याय तपासून पहा ज्यामुळे आयटीआर (ITR) भरताना तुम्हाला डिडक्शनसाठी (Deduction) दावा करता येतो.
१. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीममध्ये (ELSS) : यात गुंतणवूक केल्यास गुंतवणूक + चांगला परतावा + प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत रु. १.५ लाख पर्यंत कर सवलत असे तिहेरी फायदे आहेत. यात गुंतवणूकदाराला अगदी १०० रुपयांची एसआयपी (SIP) सुरु करता येते. तर अधिकत्तम रक्कमही गुंतवविता येते. या योजनेत सरासरी १० ते १२ टक्क्यांपर्यंत परतावा / रिटर्न मिळतात या योजनेत दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास अधिक फायदा होतो.
२. पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) ही कर बचतीसाठी आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सर्वात लोकप्रिय योजना आहे. या योजनेत प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत रु. १.५ लाख पर्यंत कर सवलत मिळते. बचत तर होतेच, त्यावर चांगला परतावा ही मिळतो.
३. राष्ट्रीय निवृत्ती योजना (NPS) : NPS मधील गुंतवणूक आयकर विभागांतर्गत ५०,००० रुपयांपर्यंतच्या कर सवलतीसाठी पात्र आहे. ही सूट आयकर कलम ८० सी अंतर्गत उपलब्ध असलेल्या १.५० लाख रुपयांच्या कर सवलतीव्यतिरिक्त आहे. अशा प्रकारे, एनपीएसवर एकूण २ लाख रुपयांची कर सूट उपलब्ध आहे.
४. प्रोव्हिडंट फंडातील (PF) गुंतवणुकीवर कर सवलत मागता येते. निवृत्तीनंतर रक्कम मिळावी यासाठी ही चांगली योजना आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत (EPF) योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते.
५. आरोग्य विमा योजना (Insurance Policy) घेणाऱ्यानांही कर सवलत मिळते. प्राप्तिकर कायदा कलम 80सी अंतर्गत रु. १.५ लाख पर्यंत तर सवलत मिळतेच याशिवाय ६० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांना आरोग्य विमा प्रीमियमवर २५,००० हजार रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो. त्याच वेळी, ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना ५०,००० रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळतो.याचा अर्थ असा की, जर तुमचे वय ६० पेक्षा कमी असेल आणि पालकांचे वय ६० पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ७५ हजार रुपयांपर्यंतचा कर लाभ मिळू शकतो. त्यांना २५,००० रुपयांची अतिरिक्त सवलतही देण्यात येते. अर्थात विमा आणि गुंतवणुक यांची उद्दिष्ट्ये वेगवेगळी आहेत आणि ती वेगवेगळी ठेवूनच ही माध्यमे वापरायला हवीत.तज्ज्ञांच्या मते, आरोग्य विमा केवळ कर सवलतींसाठी खरेदी करू नये.
